Rinku Singh On Asian Games 2023 : एशियन गेम्समध्ये भारतीय क्रिकेट संघ ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात उतरत आहे. रिंकू सिंह याचाही त्या संघात सहभाग आहे. काही दिवसांत भारतीय संघ एशियन गेम्स स्पर्धा रंगणार आहे. यंदा क्रिकेटचाही यामध्ये सहभाग करण्यात आला आहे. एशियन गेम्सला सुरुवात होण्याआधी रिंकू सिंह याने भारत सुवर्णपदक जिंकणार, असे म्हटलेय. रिंकूच्या या वक्तव्याची सध्या चर्चा सुरु आहे. आयपीएलमध्ये यश दयाल याला लागोपाठ पाच षटकार मारत कोलकाता संघाला रिंकूने विजय मिळवून दिला होता. या जेतेपदानंतर रिंकू चर्चेत आलाय. आता एशियन गेम्सच्या स्पर्धेत रिंकूला भारतीय संघासोबत पाठवलेय.
काय म्हणाला रिंकू सिंह ?
एशियन गेम्सपूर्वी रिंकू सिंगने मोठा दावा केला आहे. भारतीय संघ आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्यात नक्कीच यशस्वी होईल, असा मला पूर्ण विश्वास असल्याचे रिंकू सिंह याने म्हटलेय. आमच्याकडे प्रतिभावान कर्णधार असल्याचेही तो म्हणाला. आमच्या टीमचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड करणार आहे. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. मी लवकरात लवकर संघात सामील होण्याचा प्रयत्न करत आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघ नक्कीच सुवर्णपदक जिंकेल, असा मला विश्वास आहे, असे रिंकू म्हणाला.
एशियन गेम्स 2023 लाईव्ह प्रेक्षपण कुठे होणार ?
आशियाई क्रीडा 2023 मधील सर्व कार्यक्रमांचे भारतामध्ये थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाईल. यामध्ये, टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स चॅनल असेल, तर सोनी लाइव्ह अॅपवर सामन्यांचे ऑनलाइन स्ट्रीमिंग असेल.
भारतीय पुरुष टीम :
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), यशस्वी जायसवाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, शाहबाज अहमद, रवि बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार, शिवम मावी, शिवम दुबे, प्रभसिमरन सिंह (विकेटकीपर).
राखीव खेळाडू : यश ठाकुर, साई किशोर, वेंकटेश अय्यर, दीपक हुड्डा, साई सुदर्शन.
एशियन गेम्स 2023 पुरुष संघाचे संपूर्ण वेळापत्रक
28 सप्टेंबर – ओमान विरुद्ध सऊदी अरेबिया, भारतीय वेळेनुसार सकाळी 9:30 वाजता
28 सप्टेंबर – हाँगकाँग विरुद्ध सिंगापुर, भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता
29 सप्टेंबर – मलेशिया विरुद्ध बहरीन, भारतीय वेळेनुसार सकाळी 9:30 वाजता
29 सप्टेंबर – नेपाळ विरुद्ध इंडोनेशिया, भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता
30 सप्टेंबर – कतर विरुद्ध कुवैत, भारतीय वेळेनुसार सकाळी 9:30 वाजता
30 सप्टेंबर – यूएई विरुद्ध भूटान, भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता
1 ऑक्टोबर – अफगानिस्तान विरुद्ध चीन, भारतीय वेळेनुसार सकाळी 9:30 वाजता
1 ऑक्टोबर – पहिल्या सामन्यातील विजेता विरुद्ध दुसऱ्या सामन्यातील विजेता, भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता
2 ऑक्टोबर – तिसऱ्या सामन्यातील विजेता विरुद्ध चौथ्या सामन्यातील विजेता, भारतीय वेळेनुसार सकाळी 9:30 वाजता
2 ऑक्टोबर – पाचव्या सामन्यातील विजेता विरद्ध सहाव्या सामन्यातील विजेता , भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता
4 ऑक्टोबर – पाकिस्तान विरुद्ध आठव्या सामन्यातील विजेता, क्वार्टर फायनल 1, भारतीय वेळेनुसार सकाळी 9:30 वाजता
4 ऑक्टोबर – श्रीलंका विरुद्ध नवव्या सामन्यातील विजेता संघ, क्वार्टर फायनल 2, भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता
5 ऑक्टोबर – बांग्लादेश विरुद्ध दहाव्या सामन्यातील विजेता, क्वार्टर फायनल 3, भारतीय वेळेनुसार सकाळी 9:30 वाजता
5 ऑक्टोबर – भारत विरुद्ध 7 व्या सामन्यातील विजेता , क्वार्टर फायनल 4, भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता
6 ऑक्टोबर – पहिला सेमीफायनल सामना, भारतीय वेळेनुसार सकाळी 9:30 वाजता
6 ऑक्टोबर – दूसरा सेमीफायनल सामना, भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता
7 ऑक्टोबर – कांस्य पदक सामना, भारतीय वेळेनुसार सकाळी 9:30 वाजता
7 ऑक्टोबर – फायनल (गोल्ड मेडल ), भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता