Rohit Sharma Twitter hacked : भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) कर्णधार रोहित शर्माचं (Rohit Sharma) ट्वीटर अकाऊंट हॅक झाल्याचा संशय येत आहे. कारण त्याच्या ट्वीटरवरुन तीन विचित्र ट्वीट करण्यात आले आहेत. त्याच्या या ट्वीट्सवर अनेकजण रिप्लाय करत आहेत. दरम्यान नेमकं रोहितचं अकाऊंट हॅक झालं आहे का? आणि ते कोणी हॅक केलं आहे? याबद्दल अजून नेमकी माहिती समोर आलेली नाही. खालील तीन ट्वीट्स रोहितच्या अकाऊंटवरुन पोस्ट झाले आहेत.








रोहित शर्माच्या अकाऊंटवरुन झालेल्या या ट्वीट्सला क्रिकेटपटू तसंच अनेकजण रिप्लाय देत आहेत. यामध्ये आर आश्विन, चहल, हर्षा भोगले यांनी रिप्ला दिला आहे.





रोहितचं अकाऊंट हॅक झाल्याची दाट शक्यता?


रोहित शर्माच्या अकाऊंटवरुन करण्यात आलेले हे ट्वीट त्याने न केल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. याचा कारण या तीनही ट्वीटमध्ये फारसे साम्य नसून अतिशय विचित्र पद्धतीने हे ट्वीट करण्यात आले आहेत. तसंच रोहित हा कायम इन्स्टाग्रामवर (Rohit Sharma Instagram) अधिक अॅक्टिव्ह असतो. ट्वीटरवर काही महत्त्वाचं असल्यास तो नेमकेच ट्वीट करतो. त्यामुळे त्याचं अकाऊंट हॅक झाल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha