IND W vs TH W, Womens Asia Cup 2022: बांग्लादेश येथे सुरु असलेल्या महिला आशिया चषकात भारतीय महिला संघानं उत्कृष्ट प्रदर्शन करून दाखवलंय. या स्पर्धेतील पहिल्या सेमीफायनमध्ये भारतानं मलेशियाचा 74 धावांनी पराभव करत फायनलमध्ये धडक दिलीय. सिल्हेट आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये (Sylhet International Cricket Stadium) खेळल्या गेलेल्या या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय महिलांनी थायलँडसमोर 149 धावांचं लक्ष्य ठेवलं. या लक्ष्याचा पाठलाग करताना मलेशियाच्या संघाची दमछाक झाली. मलेशियाच्या संघाला 20 षटकात 9 विकेट्स गमावून अवघ्या 74 धावांपर्यंत मजल मारता आली. भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावणारी दिप्ती शर्मानं (Deepti Sharma) नव्या विक्रमाला गवसणी घातलीय. 


दिप्ती शर्मानं पाकिस्तानी गोलंदाजाचा विक्रम मोडला
मलेशियाविरुद्ध आज खेळल्या गेल्या महिला आशिया चषकातील पहिल्या सेमीफायनलमध्ये दीप्ती शर्मानं चार षटकांत सात धावा देऊन तीन विकेट्स घेतल्या. यातील एक षटक तिनं निर्धावही टाकलंय. यंदाच्या आशिया चषक स्पर्धेत दीप्तीनं सर्वाधिक 13 विकेट्स घेतल्या आहेत. या कामगिरीसह दिप्ती शर्मानं पाकिस्तानच्या साना मिरचा विक्रम मोडीत काढलाय.  महिला आशिया चषकातील एका पर्वात सर्वाधिक विकेटस् घेण्याचा विक्रम साना मिरच्या नावावर होता. तिनं 2016 च्या महिला आशिया चषकात सर्वाधिक 12 विकेट्स घेतल्या होत्या. 


महिला आशिया चषकात भारताची दमदार कामगिरी
महिला आशिया चषकात भारतीय महिलांनी चमकदार कामगिरी करून दाखवली. या स्पर्धेत गट सामन्यात भारतानं सहा पैकी पाच सामने जिंकत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर पहिल्यांदाच महिला आशिया चषकाच्या सेमीफायनमध्ये पोहचलेल्या मलेशियाविरुद्ध एकतर्फी सामना जिंकला. 


फायनमध्ये कोणाशी भिडणार?
महिला आशिया चषक 2022 च्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये पाकिस्तान आणि श्रीलंकेचा संघ आमने-सामने आले आहेत. या सामन्यात विजय मिळवणारा संघ फायनलमध्ये भारताशी सामना खेळेल. दरम्यान, भारतीय महिलांनी आतापर्यंत सर्वाधिक सहा वेळा आशिया चषकावर नाव कोरलंय. सुरुवातीचे चार महिला आशिया चषक (2004 ते 2008) एकदिवसीय स्वरूपात आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर 2012 पासून महिला आशिया चषक टी-20 फॉरमॅटमध्ये खेळला जातोय. भारतीय महिलांचा या स्पर्धेत वर्चस्व आहे. कारण त्यांनी मागील एक आशिया चषक वगळता प्रत्येक महिला आशिया चषक जिंकला आहे.


हे देखील वाचा-


टी-20 विश्वचषकात सर्वाधिक शतक मारणाऱ्या फलंदाजांमध्ये ख्रिस गेल अव्वल