India vs West Indies 2nd Test 5th Day Weather Update : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना रंगतदार अवस्थेत पोहचलाय. अखेरच्या दिवशी भारताला विजयासाठी आठ विकेटची गरज आहे. तर वेस्ट इंडिजला  289 धावांची गरज आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा वेस्ट इंडिजने दुसऱ्या डावात 32 षटकांत 2 बाद 76 धावांपर्यंत मजल मारली. भारताने वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी 365 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. आता शेवटच्या दिवशी वेस्ट इंडिजला 289 धावांची गरज आहे. तर टीम इंडियाला विजयासाठी 8 विकेट्स घ्याव्या लागतील. पण त्रिनिदादमध्ये शेवटच्या दिवशी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे सामना उशीरा सुरुवात होणार आहे. सामन्यापूर्वी पावसामुळे मैदानावर कव्हर टाकण्यात आले आहेत. बातमी लिहेपर्यंत पाऊस थांबला नव्हता. त्यामुळे सामना उशिरा सुरू होण्याची शक्यता आहे. भारताने पहिल्या डावात 438 धावा आणि दुसऱ्या डावात 181 धावा करून डाव घोषित केला. 


भारत-वेस्ट इंडिज कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद येथे खेळवला जात आहे. दुसऱ्या कसोटीच्या शेवटच्या दिवशी खेळ सुरू होण्यापूर्वीच पावसाने हजेरी लावली.  त्यामुळे सामना उशिरा सुरू होऊ शकतो. सध्या खेळपट्टीवर कव्हर आहेत. पाऊस थांबला तर सामनाही वेळेवर सुरू होऊ शकतो. सामना कधी सुरु होणार, याबाबत बीसीसीआय किंवा वेस्ट इंडिज क्रिकेटच्या ट्विटर हँडलवर याबाबत कोणतीही माहिती शेअर करण्यात आलेली नाही.






चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर वेस्ट इंडिजने दुसऱ्या डावात 32 षटकांत 2 बाद 76 धावांपर्यंत मजल मारली. भारताने वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी 365 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. आता शेवटच्या दिवशी वेस्ट इंडिजला 289 धावांची गरज आहे. तर टीम इंडियाला विजयासाठी 8 विकेट्स घ्याव्या लागतील. तत्पूर्वी, भारताने 2 बाद 179 धावा करून आपला दुसरा डाव घोषित केला. भारताकडून इशान किशन आणि रोहित शर्मा यांनी अर्धशतके झळकावली. वेस्ट इंडिजचा कर्णधार क्रेग ब्रॅथवेट आणि कर्क मॅकेन्झी यांना बाद करण्यात भारताला यश आलेय. या दोन्ही फलंदाजांना ऑफस्पिनर रवी अश्विनने याने तंबूचा रस्ता दाखवला. क्रेग ब्रॅथवेटने 52 चेंडूत 28 धावांचे योगदान दिले. तर मॅकेन्झी एकही धाव न काढता पायचीत झाला.  चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर  चंद्रपॉल आणि ब्लॅकवूड नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतले. तेगनारायण चंद्रपॉल २४ धावा करून खेळत आहे. ब्लॅकवूड 20 धावा करून नाबाद परतला.


त्यापूर्वी, भारताने 2 बाद 179 धावा करून आपला दुसरा डाव घोषित केला. पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर भारताने वेस्ट इंडिजला सामना जिंकण्यासाठी 365 धावांचे लक्ष्य दिले.  दुसऱ्या डावात भारतासाठी कर्णधार रोहित शर्माशिवाय इशान किशनने अर्धशतकी खेळी केली.  रोहित शर्माने 44 चेंडूत 57 धावांची खेळी केली. तर इशान किशन 34 चेंडूत 52 धावा करून नाबाद परतला. वेस्ट इंडिजकडून शॅनन गॅब्रिएल आणि जोमेल वॅरिकन यांना 1-1 असे यश मिळाले. त्याचवेळी, याआधी भारताने पहिल्या डावात 438 धावा केल्या होत्या. याला प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा पहिला डाव 255 धावांवर आटोपला. भारताकडून वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने नेत्रदीपक गोलंदाजी सादर केली. मोहम्मद सिराजने वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावात 5 खेळाडूंना तंबूत पाठवले होते.