India vs West indies ODI series Ahmedabad : शिखर धवन, ऋतुराज गायकवाड आणि श्रेयस अय्यर या तीन खेळाडूंना वगळता इतर भारतीय खेळाडूंनी सरावाला सुरुवात केली आहे. सर्व खेळाडूंची आरटीपीसीआर टेट्स निगेटिव्ह आली आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर टीम इंडियाने सरवाला सुरुवात केली आहे. सहा फ्रेबुवारीपासून वेस्ट इंडिजविरोधात तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेला सुरुवात होणार आहे.
कोरोना झाल्यामुळे शिखर धवन, ऋतुराज गायकवाड आणि श्रेयस अय्यर हे तिन्हीही खेळाडू वनडे मालिकेतून बाहेर गेले आहेत. त्यामुळे मयंक अग्रवाल याला भारतीय संघात स्थान देण्यात आलेय. मयंक अग्रवाल सरळ पहिल्या सामन्याला खेळण्याची शक्यता आहे. कारण, मयंक तीन दिवसाच्या विलगीकरणात आहे. त्यानंतर तो संघासोबत जोडला जाणार आहे. आज भारतीय संघाने सरावाला सुरुवात केली. यावेळी ट्रेनरही त्यांच्यासोबत होते, असे बीसीसीआयमधील एका सुत्राने सांगितले.
वेस्ट इंडिज विरुद्ध भारताचा एकदिवसीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकिपर), दीपक चहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान
वेस्ट इंडिज विरुद्ध भारताचा टी20 संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवि बिश्नोई, अक्षर पटेल, यजुवेंद्र चहल, वॉशिंगटन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वरकुमार, आवेश खान, हर्षल पटेल.
कोरोनाचा धोका लक्षात घेऊन बीसीसीआयने तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि तीन टी-20 सामने दोनच मैदानांवर घेण्याचा निर्णय घेतला आहे. तिन्ही टी-20 सामने कोलकात्यात खेळवले जातील.
वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्याचं वेळापत्रक
एकदिवसीय मालिका -
6 फ्रेबुवारी 2022 - अहमदाबाद
9 फेब्रुवारी 2022 - अहमदाबाद
12 फेब्रुवारी 2022 - अहमदाबाद
टी-20 मालिका
15 फ्रेब्रुवारी 2022 - कोलकाता
18 फेब्रुवारी 2022 - कोलकाता
20 फेब्रुवारी 2022 - कोलकाता
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live