India vs West Indies 3rd T20I Weather Report : सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून वेस्ट इंडिजने पाच सामन्याच्या मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे. मंगळवारी तिसरा टी20 सामना होणार आहे. हा सामना जिंकून विडिंजच्या संघ मालिका विजयासाठी प्रयत्न करणार आहे. तर भारतीय संघ कमबॅक करण्यासाठी प्रयत्नशील असेल. पण तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पावसाचा व्यत्यय येण्याची शक्याता आहे. वेस्ट इंडिजने पहिला सामना चार धावांनी जिंकला होता तर दुसऱ्या सामन्यात दोन विकेटने बाजी मारली होती. दोन्ही सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी ढेपाळल्याचे दिसले. तिसरा सामना आठ ऑगस्ट रोजी गायाना स्टेडिअमवर होणार आहे. 


हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील भारतीय संघाला मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी तिसऱ्या सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. पण येथील वेदर रिपोर्टमुळे क्रीडा चाहत्यांना निराशा झालाय.  भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामन्यात पावसाची शक्यता आहे. येथील वातावरण 32 डिग्री सेल्सियसच्या आसपास  राहण्याची शक्यता आहे.  24 टक्के पावसाची शक्यता स्थानिक हवामान विभागाने वर्तवलाय.  


टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज टी20 आंतरराष्ट्रीय हेड टू हेड 


टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात आतापर्यंत 27 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळवले गेले आहेत. ज्यामध्ये टीम इंडियानं 17 सामने जिंकले आहेत. तर वेस्ट इंडिजनं केवळ 9 सामने जिंकले आहेत. याव्यतिरिक्त एक सामना अनिर्णित राहिला आहे. 


भारतीय फलंदाज ढेपाळले - 


पहिल्या दोन्ही सामन्यात फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे भारतीय संघाला पराभवाचा सामना केलाय. पहिल्या सामन्यात टीम इंडिया फक्त 145 धावांपर्यंत मजल मारु शकला. हा सामना विडिंजचे 4 धावांनी जिंकला. तर दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडिया 152 धावांपर्यंत मजल मारु शकला. हा सामना विडिंजने दोन विकेटने जिंकला. अशा स्थितीत तिसऱ्या वनडे सामन्यात प्लेईंग 11 मध्ये बदलाची शक्यता आहे. 


संजू सॅमसन याला दोन्ही सामन्यात अपयश आले. अशा स्थितीत तिसर्या क्रमांकावर यशस्वी जायस्वाल याला संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याशिवाय अर्शदीप सिंह याच्या जाही उमरान मलिक यालाही संधी मिळू शकते.  


टीम इंडियाचा टी20 संघ 
यशस्वी जायसवाल, ईशान किशन (विकेटकीपर), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या (कर्णधार), अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, उमरान मलिक, मुकेश कुमार, कुलदीप यादव, आवेश खान, रवि बिश्नोई, तिलक वर्मा. 


वेस्ट इंडीजचा टी20 संघ 
काइल मेयर्स, जॉनसन चार्ल्स, निकोलस पूरन (विकेटकीपर), शाई होप, शिमरोन हेटमायर, रोवमॅन पॉवेल (कर्णधार), जेसन होल्डर, अकील हुसैन, अल्जारी जोसेफ, ओबेड मॅकॉय, ओशाने थॉमस, ब्रँडन किंग, ओडियन स्मिथ, रोस्टन चेस, रोमारियो शेफर्ड.