Australia Preliminary Squad ODI World Cup 2023 : भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. प्रत्येक संघांनी विश्वचषकाची तयारी सुरु केली आहे. याच विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाने आपल्या 18 सदसीय संघाची घोषणा केली आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाली ऑस्ट्रलिया संघात काही नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. विश्वचषकाला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी भारताविरोधात होणार आहे. ऑस्ट्रेलियाने युवा तनवीर सांघा याला 18 जणांच्या स्कॉडमध्ये स्थान दिलेय. आयसीसीच्या नियमांनुसार, विश्वचषकात सहभागी होणाऱ्या सर्व संघाना 28 सप्टेंबरपर्यंत अंतिम 15 खेळाडूंची नावे द्यायची आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रमुख निवडकर्ते जॉर्ज बेली यांनी 18 जणांच्या स्कॉडची निवड केली आहे.

वनडे विश्वचषकात ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व पॅट कमिन्स करणार आहे. 18 जणांच्या संघामध्ये मार्नस लाबुशेन याला संधी दिलेली नाही. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिलेल्या माहितीनुसार, 18 खेळाडूंमधून विश्वचषकासाठी 15 जणांची निवड करण्यात येणार आहे. इतर खेळाडूंना बॅकअप म्हणून ठेवण्यात येणार आहे. विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचा संघ मार्नस लाबुशेनशिवाय उतरणार आहे. आयपीएलआधी भारतात झालेल्या वनडे मालिकेत लाबुशेन ऑस्ट्रेलिया संघाचा सदस्य होता. पण आता विश्वचषकात त्याला संधी दिलेली नाही.  ऑस्ट्रेलियाच्या संघात डेविड वॉर्नर आणि जोश हेजलवूड यांचे पुनरागमन झालेय. 

5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर यादरम्यान भारतामध्ये यंदाचा विश्वचषक होणार आहे. पहिला आणि अखेरचा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये होणार आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी भारताविरोधात होणार आहे. विश्वचषकाचे काऊंटडाऊन सुरु झालेय. यंदाचा विश्वचषक दहा संघामध्ये राऊंड रॉबिन पद्धतीने रंगणार आहे. यंदाच्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाच्या संघाला विजयाचा दावेदार म्हटलेय जातेय. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत पाच वेळा वनडे विश्वचषकावर नाव कोरलेय. 1987, 1999, 2003, 2007 आणि 2015 मध्ये ऑस्ट्रेलियाने टी 20 विश्वचषक उंचावला आहे. 

विश्वचषकासाठी निवडण्यात आलेला ऑस्ट्रेलियाचा 18 सदसीय संघ -

पॅट कमिन्स (कर्णधार), सीन एबॉट, एश्टम एगर, अॅलेक्स खॅरी, नॅथन एलस, कॅमरुन ग्रीन, एरॉन हार्डी, जोश हेलवडून, ट्रेविस हेड, जोश इंग्लिंस, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तनवीर सांघा, स्टिव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस, डेविड वॉर्नर, अॅडम झाम्पा

ऑस्ट्रेलियाचे विश्वचषकाचे वेळापत्रक - 

8- ऑक्टोबर- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया- चेन्नई13- ऑक्टोबर- ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका - लखनौ16- ऑक्टोबर - ऑस्ट्रेलिया विरुद्ध नेदरलँड - लखनौ20- ऑक्टोबर- ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान- बेंगलोर25- ऑक्टोबर- ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका - दिल्ली28- ऑक्टोबर- ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड - धर्मशाला4- नोव्हेंबर- ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड - अहमदाबाद7- नोव्हेंबर- ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगानिस्तान - मुंबई12- नोव्हेंबर- ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश- पुणे