India vs West Indies 3rd ODI, Playing XI: भारत विरुद्ध वेस्ट इंडीज (India vs West Indies) असा एकदिवसीय सामना काही तासांत रंगणार आहे. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील हा अखेरचा सामना आहे. भारताने पहिले दोन सामने जिंकत मालिका जिंकली असली तरी व्हाईट वॉशसाठी (White Wash to WI) आजचा विजय अनिवार्य आहे. अशामध्ये भारत या सामन्यात आपली अंतिम 11 शक्यतो बदलणार नाही. पण दौऱ्यावर संघात नाव असणाऱ्या अर्शदीप सिंहला (Arshdeep Singh) किमान अखेरच्या सामन्यात खेळण्याची संधी मिळेल अशी आशा आहे. ज्यामुळे त्याला डेब्यूची संधी मिळू शकते. दुसऱ्या सामन्यात डेब्यू करणाऱ्या आवेशला विश्रांती दिली जाऊ शकते. तर नेमकी अंतिम 11 कशी असू शकते हे पाहूया...
भारताची संभाव्य अंतिम 11 - शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), दीपक हुडा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, अर्शदीप सिंह, आवेश खान, युजवेंद्र चहल आणि मोहम्मद सिराज
चुरशीची लढत पाहायला मिळणार
भारत आणि वेस्ट इंडीज मालिकेतील पहिले दोन्ही सामने अत्यंत चुरशीचे झाले. दोन्ही सामन्यात दोन्ही संघानी 300 पार धावसंख्या नेली. पहिल्या सामन्यात वेस्ट इंडीज केवळ 3 धावांनी पराभूत झाला. तर दुसऱ्या सामन्यातही भारत अखेरच्या षटकाच 312 धावांचे आव्हान केवळ दोन गडी राखून पूर्ण करु शकला. त्यामुळे दोन्ही चुरशीचे सामने पाहायाला मिळाले आहेत. याशिवाय मैदानाची खेळपट्टी ही फिरकीपटूंसाठी अधिक फायदेशीर असून त्यांना जास्त विकेट मिळून ते धावाही रोखू शकतात. दरम्यान यामुळे भारतीय गोलंदाजीची धुरा युजवेंद्र चहल आणि अक्षर पटेलकडे असेल. मैदानाची खेळपट्टी एक मोठी धावसंख्या देखील संघाना मिळवून देऊ शकते. त्यामुळे पहिल्या दोन्ही सामन्यांप्रमाणे एक मोठी धावसंख्या होऊ शकते.
हे देखील वाचा-
- ODI ranking : विराट कोहलीचं दृष्टचक्र संपेना, 7 वर्षांत सर्वात खराब एकदिवसीय क्रमवारी, रोहितची रॅकिंगही घसरली
- BCCI on WC ODI World Cup : 2025 महिला विश्वचषक भारतात, दणक्यात पार पाडणार स्पर्धा, बीसीसीयचा निर्धार
- IND vs WI, 2nd ODI Result : अक्षरचं संयमी अर्धशतक, संजू-श्रेयसची भागिदारी, भारतानं सर केला 312 धावांचा डोंगर, मालिकेतही विजयी आघाडी