एक्स्प्लोर

IND vs WI : यशस्वी, रोहितसह विराटच्या नावावर विक्रमांची नोंद, पाहा दुसऱ्या दिवशी कोण कोणते रेकॉर्ड झाले

1st Test Day 2 Record : दुसऱ्या दिवशीही अनेक विक्रम झाले. रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल आणि विराट कोहली यांनी अनेक विक्रमांना गवसणी घातली. पाहूयात दुसऱ्या दिवशी कोण कोणते विक्रम झाले. 

India vs West Indies 1st Test Day 2 Record : डोमिनिका कसोटीच्या दुसऱ्या दिवसाअखेर भारत मजबूत स्थितीत आहे. रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल दोघांनी शतके झळकावली आहेत. दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघाने दोन बाद 312 धावा केल्या आहेत. यशस्वी जयस्वाल 143 आणि विराट कोहली 36 धावांवर खेळत आहेत. भारताकडे 162 धावांची आघाडी आहे. दुसऱ्या दिवशीही अनेक विक्रम झाले. रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल आणि विराट कोहली यांनी अनेक विक्रमांना गवसणी घातली. पाहूयात दुसऱ्या दिवशी कोण कोणते विक्रम झाले. 

कसोटीत सर्वाधिक धावा करणारा विराट पाचवा भारतीय खेळाडू
विराट कोहली भारताकडून कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा पाचवा खेळाडू ठरला आहे. विराट कोहलीने आपल्या कसोटी कारकिर्दीत 8504 धावा केल्या आहेत. भारताकडून कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे. सचिन तेंडुलकरच्या नावावर 15921 धावा आहेत. तो कसोटी इतिहासात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. तर राहुल द्रविड भारतासाठी कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकावर आहे. राहुल द्रविडने आपल्या कसोटी कारकिर्दीत 13265 धावा केल्या.

विरेंद्र सेहवागला विराट कोहलीने टाकलं मागे
माजी कर्णधार विराट कोहलीने 8500 धावांचा पल्ला पार केला आहे. कसोटीमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजामध्ये विराट कोहली पाचव्या स्थानावर पोहचला आहे. विराट कोहलीने 110 व्या सामन्यात 8500 धावांचा पल्ला पार केला आहे. या कामगिरीत विराट कोहलीने विरेंद्र सेहवागला मागे टाकलं आहे. विराट कोहलीच्या पुढे आता लक्ष्मण, गावस्कर, द्रविड आणि सचिन तेंडुलकर हे फलंदाज आहेत. 

यशस्वीचा पदार्पणात शतकी तडाखा - 

युवा यशस्वी जयस्वाल याने पदार्पणात शतक झळकावले आहे. यशस्वी जयस्वाल 143 धावांवर खेळत आहे. या खेळीत यशस्वीने 14 चौकार लगावले आहेत.  पदार्पणात विदेशात शतक झळकावणारा यशस्वी जयस्वाल चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे. तर पदार्पणात शतक झळकावणारा यशस्वी जयस्वाल दहावा भारतीय फलंदाज झालाय. त्याशिवाय पदार्पणातच सर्वाधिक चेंडू खेळण्याचा विक्रमही यशस्वी जयस्वालने केला आहे. पदार्पणात विदेशात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम यशस्वी जयस्वाल याने केला आहे, याआधी असा पराक्रम कुणालाही करता आला नाही.

पदार्पणात कुणी कुणी शतक ठोकले - 

यशस्वी जयस्वाल 2023, वेस्ट इंडिज - विदेशात
श्रेयस अय्यर 2021, न्यूझीलंड, मायदेशात
पृथ्वी शॉ 2018, वेस्ट इंडिज - मायदेशात 
रोहित शर्मा 2013, वेस्ट इंडिज, मायदेशात
शिखर धवन 2013, ऑस्ट्रेलिया, मायदेशात
सुरेश रैना 2010, श्रीलंका, विदेशात
विरेंद्र सेहवाग 2001, दक्षिण आफ्रिका, विदेशात
सौरव गांगुली 1996, इंग्लंड, विदेशात
प्रविण आमरे 1992, दक्षिण आफ्रिका विदेशात
मोहम्मद अझरुद्दीन 1984, इंग्लंड, मायदेशात

पदार्पणात शतक झळकावणारा तिसरा भारतीय सलामी - 

पदार्पणात शतक झळकावणारा यशस्वी जयस्वाल तिसरा भारतीय सलामी फलंदाज ठरला आहे. शिखर धवन पदार्पणात शतक झळकावणारा पहिला भारतीय सलामी फलंदाज आहे. 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात शिखर धवन याने पदार्पणात 187 धावांची खेळी केली होती. तर पृथ्वी शॉ दुसरा सलामी फलंदाज आहे. या यादीत आता यशस्वीचे नाव जोडले गेलेय. 

पदार्पणात शतक झळकावणारा चौथा युवा - 

पदार्पणात शतक झळकावणारा यशस्वी जयस्वाल चौथा युवा फलंदाज आहे. यशस्वीने 21 वर्ष 196 दिवस असताना शतक झळकावले. पृथ्वी शॉ याने 18 वर्ष 329 दिवसाचा असताना शतक झळकावले होते. अब्बास अली बेग याने 20 वर्ष 126 दिवसाचा असताना शतक झळकावलेय. गुंडप्पा विश्वनाथ याने 20 वर्ष 276 दिवसाचा असताना शतक झळकावले होते.  मोहम्मद अजहरूद्दीन याने 21 वर्ष 327 दिवसाचा असताना शतक झळकावले. 

रोहित शर्माच्या नावावर विक्रम - 

रोहित शर्माने कसोटीत मोठा विक्रम नावावर केला आहे. कसोटीमध्ये सलामीला रोहित शर्माने 39 डावात सात शतके आणि चार अर्धशतके झळकावण्याचा विक्रम केलाय. त्याशिवाय कसोटीमध्ये रोहित शर्माने 3500 धावांचा पल्ला पार केला आहे. रोहित शर्माने 46 च्या सरासरीने धावांचा पाऊस पाडलाय. 2019 मध्ये रोहित शर्मा कसोटीत सलामीला उतरला अन् तेव्हापासून त्याने खोऱ्याने धावा चोपल्या आहेत. सलामीला फलंदाजी करताना 50 पेक्षा जास्त धावा काढण्यात रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Eng vs Pak 1st Test : कसोटी मालिकेच्या पहिल्याच बॉलवर संपूर्ण पाकिस्तानी ड्रेसिंग रुमला शॉक, इंग्लंडविरुद्ध सलामीवीर गोल्डन डकवर चारही मुंड्या चीत, पाहा Video
कसोटी मालिकेच्या पहिल्याच बॉलवर संपूर्ण पाकिस्तानी ड्रेसिंग रुमला शॉक, इंग्लंडविरुद्ध सलामीवीर गोल्डन डकवर चारही मुंड्या चीत, पाहा Video

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget