Indias Probable Playing 11 : आज क्विन्स पार्क ओव्हल स्टेडियमवर भारत विरुद्ध वेस्ट इंडीज (India vs West Indies) एकदिवसीय सामना खेळवला जात आहे. एकदिवसीय मालिकेतील हा पहिलाच सामना आहे. दरम्यान या मालिकेसाठी भारतीय संघातील रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत, बुमराह हे दिग्गज खेळाडू विश्रांतीवर असल्याने युवा खेळाडूंना घेऊन शिखर धवन कर्णधार म्हणून मैदानात उतरणा आहे. तर नेमके भारताचे कोणते 11 धुरंधर मैदानात उतरु शकतात पाहूया...
सलामीचा विचात केल्यास कर्णधार शिखरसोबत शुभमन मैदानात येऊ शकतो. त्यानंतर सूर्यकुमार आणि श्रेयस हे तगडे फलंदाज मैदानात येतील. मग स्फोटक दीपक हु़डा, संजू सॅमसन हे हजेरी लावू शकतात. रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) आजच्या सामन्यात खेळणार की नाही? हे नाणेफेक दरम्यान स्पष्ट होईल. सध्या बीसीसीआयचे (BCCI) वैद्यकीय टीम जाडेजाच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहे. आजच्या सामन्यात रवींद्र जाडेजा न खेळल्यास त्याच्या ऐवजी अक्षर पटेलला संघात जागा देण्यात येईल. रवींद्र जाडेजा न खेळल्यास वेंकटेश अय्यरलाही संधी दिली जाऊ शकते. ज्यानंतर युजवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह यांच्यावर गोलंदाजीची धुरा असेल.
अशी असू शकते भारताची आजची अंतिम 11
शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, रवींद्र जाडेजा, संजू सॅमसन (विकेटकिपर), युजवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह.
हे देखील वाचा-
- IND vs WI, 1st ODI Preview : आज रंगणार भारत विरुद्ध वेस्ट इंडीज सामना, मैदानाची स्थिती, Head to Head रेकॉर्ड, सर्वकाही एका क्लिकवर
- CWG 2022: क्रिकेट, हॉकी, कुस्ती, बॅडमिंटनपासून तर प्रत्येक खेळापर्यंत! कॉमनवेल्थ गेम्समधील भारतीय खेळाडूंचं संपूर्ण वेळापत्रक
- Neeraj Chopra: नीरज चोप्रा इतिहास रचणार? पहिल्यांदाच वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये, पहिल्याच प्रयत्नात 88.39 मीटर थ्रो!