Rishabh Pant Test Record: भारत आणि श्रीलंका यांच्यात बंगळुरुच्या (Bengaluru) एम चिन्नास्वामी स्डेडियमवर (M.Chinnaswamy Stadium) सुरु असलेल्या या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतनं भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलदगतीने अर्धशतक झळकावत नवा विक्रम केला आहे. पंतने अवघ्या 28 चेंडूत अर्धशतक झळकावत महान क्रिकेटपटू कपिल देव यांचा 40 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे.
भारताचा स्फोटक फलंदाज ऋषभ पंतने आज अगदी टी20 क्रिकेटप्रमाणे फलंदाजी करायला सुरुवात केली असून 28 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकार झळकावत अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर काही चेंडू खेळताच तो बादही झाला. पण तोवर त्याने भारताकडून सर्वात जलदगतीने कसोटी अर्धशतक झळकावण्याचा विक्रम नावे केला. याआधी हा विक्रम कपिल देव यांच्या नावावर होता. त्यांनी 1982 मध्ये पाकिस्तानविरुद्ध 30 चेंडूत अर्धशतक झळकावलं होतं.
भारताकडून सर्वात जलदगतीने कसोटी अर्धशतक
खेळाडू | चेंडू | विरुद्ध संघ | वर्ष आणि ठिकाण |
ऋषभ पंत | 28 चेंडू | श्रीलंका | 2022 (बंगळुरु) |
कपिल देव | 30 चेंडू | पाकिस्तान | 1982 (कराची) |
शार्दूल ठाकूर | 31 चेंडू | इंग्लंड | 2021 (ओव्हल) |
वीरेंद्र सेहवाग | 32 चेंडू | इंग्लंड | 2008 (चेन्नई) |
हे देखील वाचा-
- IND Vs SL: भारतासाठी 400 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा रोहित शर्मा ठरला 9वा खेळाडू, यादीत पहिल्या स्थानावर कोण?
- Sachin on Sreesanth's Retirement: 'तू कायमच एक कतृत्त्ववान गोलंदाज होतास, दुसऱ्या इनिंगसाठी शुभेच्छा', सचिनची श्रीशांतसाठी खास पोस्ट
- IND Vs SL, 2nd Test: बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्डेडियमवर जसप्रीत बुमराहनं रचला विक्रम
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha