IND vs SL Asia Cup 2023 Final LIVE: आशियाचा किंग कोण? भारत-श्रीलंकामध्ये मेगा फायनल, लाईव्ह अपडेट
India vs Sri Lanka Final Asia Cup 2023 LIVE : आज आशिया चषकाच्या (Asia Cup 2023) अंतिम सामन्यात टीम इंडियाचा (Team India) सामना यजमान श्रीलंकेशी होणार आहे.
श्रीलंकेने दिलेले ५१ धावांचे माफक आव्हान भारताने ६.१ षटकात आरामात पार केले. भारताने दहा विकेटने श्रीलंकेचा पराभव केला. शुभमन गिल आणि ईशान किशन यांनी नाबाद ५१ धावांची भागिदारी करत भारताला सहज विजय मिळवून दिला. शुभमन गिल याने १९ चेंडूत सहा चौकारांच्या मदतीने नाबाद २७ धावांची खेळी केली. तर ईशान किशन याने १८ चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने नाबाद २३ धावांची खेळी केली.
तीन षटकानंतर टीम इंडियाच्या 32 धावा
दोन षटकात भारताची धावसंख्या 17
टीम इंडियाच्या डावाला सुरुवात... 51 धावांचं लक्ष्य
अवघ्या ५० धावांत श्रीलंकेचा सर्व संघ तंबूत परतला आहे. मोहम्मद सिराजने सहा तर हार्दिक पांड्याने तीन विकेट घेतल्या
श्रीलंकेला नववा धक्का बसला आहे, हार्दिक पांड्याने दुसरी विकेट घेतली... विराट कोहलीने स्लिपमध्ये जबरदस्त झेल घेतला. अवघ्या ५० धावांत श्रीलंकेचे ९ गडी तंबूत
१४.१ षटकात श्रीलंकेच्या ५० धावा पूर्ण
हार्दिक पांड्याने दिला श्रीलंकेला आठवा धक्का.....
कुशल मेंडिसला बाद करत श्रीलंकेला सिराजने दिला सातवा धक्का
नऊ षटकानंतर श्रीलंका ३१ धावांत सहा गडी बाद... सिराजने घेतल्या पाच विकेट
मोहम्मद सिराजचा भेदक मारा... मोहम्मद सिराज याने घेतल्या पाच विकेट
सिराजने एकाच षटकात घेतल्या चार विकेट
जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीसमोर श्रीलंकेच्या गोलंदाजांनी गुडघे टेकले आहेत. श्रीलंकेचा अर्धा संघ अघ्या १२ धावांत तंबूत परतलाय. मोहम्मद सिराज याने चार विकेट घेतल्या आहेत.
मोहम्मद सिराजची भेदक गोलंदाजी... श्रीलंकेला दिला तिसरा धक्का..... श्रीलंका चार बाद आठ धावा
सिराजने श्रीलंकेला लागोपाठ दोन धक्के दिला. श्रीलंकेची खराब सरुवात झाली आहे. आघाडीचे तीन फलंदाज मायदेशात परतले आहेत.
मोहम्मद सिराजने श्रीलंकेला दिला दुसरा धक्का.... भारताची दमदार सुरुवात
श्रीलंकेला पहिला धक्का
सामन्याला सुरुवात.....
पावसाने विश्रांती घेतली आहे.. मैदानावरुन कव्हर्स काढण्यात येत आहेत.
नाणेफेक झाल्यानंतर कोलंबोमध्ये पावसाची हजेरी...
शुभमन गिल, रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन, हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा , वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज
पथुम निसंका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चॅरिथ असलंका, धनंजय डी सिल्वा, दासुन शनाका (कर्णधार), डुनिथ वेल्लेलागे, दुशान हेमंथा, प्रमोद मदुशन, मथीशा पथिराना
श्रीलंका संघात एक बदल झालाय. महिश तिक्ष्णा दुखापतीमुळे बाहेर
श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
भारताचा अक्षर पटेल तर श्रीलंकेचा महिक्ष तिक्ष्णा फायनलमधून बाहेर
थोड्याच वेळात होणार नाणेफेक
आशिया चषकाची फायनल थोड्याच वेळात सुरु होणार आहे. आशिया चषकाच्या फायनलसाठी भारत आणि श्रीलंका आठव्यांदा आमनेसामने आले आहेत.
आशिया चषका 2023 स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी होणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडिअमवर लढत होणार आहे. ३० ऑगस्टपासून सुरु असणाऱ्या स्पर्धेचा विजेता रविवारी मिळणार आहे. अंतिम सामन्यावर पावसाचे सावट आहे. पण दिलासादायक बाब म्हणजे, फायनलसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. सुपर ४ फेरीत श्रीलंकेला हरवत भारताने फायनलमध्ये प्रवेश केला होता. फायनलचे तिकिट मिळवणारा भारत पहिला संघ ठरला होता. पाकिस्तानचा पराभव करत श्रीलंका संघाने फायनलमध्ये प्रवेश केला होता. आता रविवारी आशिया चषकाचा किंग कोण? यावरुन पडदा उठणार आहे. पण भारत आणि श्रीलंका आशिया चषकाच्या फायनलमध्ये आठव्यांदा आमनेसामने आलेत. याआधी या दोन संघामध्ये सातवेळा स्पर्धा रंगली होती. रविवारी आशिया चषकाचा किंग कोण? यावरुन पडदा उठणार आहे.
रविवारी भारत आणि श्रीलंका संघामध्ये फायनलचा थरार होणार आहे. त्यापूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का बसलाय. अक्षर पटेल याच्या दुखापतीबाबत बीसीसीआयने ट्वीट करत माहिती दिली आहे. त्याशिवाय वॉशिंगटन सुंदर श्रीलंकेत दाखल झाल्याचेही बीसीसीआय सांगितलेय. फायनलआधी वॉशिंगटन सुंदर टीम इंडियासोबत जोडला आहे.
आशिया चषकाची फायनल भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये आज होणार आहेत. आशिया चषकात फायनलमध्ये हे दोन्ही संघ आठव्यांदा आमनेसामने येतील
पार्श्वभूमी
Asia Cup 2023: आज आशिया चषकाच्या (Asia Cup 2023) अंतिम सामन्यात टीम इंडियाचा (Team India) सामना यजमान श्रीलंकेशी होणार आहे. आशिया चषकाच्या अंतिम फेरीत टीम इंडिया आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यात सामना होण्याची ही आठवी वेळ असेल. आतापर्यंत दोन्ही संघांमधील 7 अंतिम सामन्यांमध्ये टीम इंडियानं चार वेळा विजय मिळवला आहे, तर श्रीलंकेनं तीन वेळा विजय मिळवला आहे. टीम इंडियानं आशिया चषकाचे विजेतेपद विक्रमी 7 वेळा जिंकलं आहे. त्यामुळे, यंदा टीम इंडियाला हरवून श्रीलंकेलाही चौथ्यांदा आशिया चषक उंचावून टीम इंडियाच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी आहे.
यंदा श्रीलंकेच्या संघानं सर्वांना चकित करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. हसरंगासारख्या स्टार अष्टपैलू खेळाडूच्या दुखापतीमुळे श्रीलंकन संघासाठी अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास फारचा कठीण जाईल, असं बोललं जात होतं. मात्र युवा खेळाडूंच्या जोरावर श्रीलंकेनं पाकिस्तानसारख्या बलाढ्य संघाचा पराभव करत अंतिम फेरीत स्थान निश्चित केलं आहे. आज टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात आशिया चषकाचा अंतिम सामना होणार आहे. दरम्यान, आजच्या सामन्यात जर पावसानं हजेरी लावली तर अंतिम सामन्यासाठी एक राखीव दिवसही ठेवण्यात आला आहे. आज पाऊस आला तर उद्या (सोमवारी) अंतिम सामना खेळवला जाईल.
आशिया चषकाच्या अंतिम फेरीत प्रेमदासा स्टेडियमवर आज भारत-श्रीलंका संघ आमने-सामने येणार आहेत. या स्पर्धेतील सुपर फोर फेरीत भारताने श्रीलंका आणि पाकिस्तान दोघांनाही धूळ चारली होती. तर, श्रीलंकेने आधी बांगलादेशला पराभूत केलं आणि नंतर पाकिस्तानवर अखेरच्या चेंडूवर मात करत फायनल गाठलीय. त्यामुळे आजच्या सामन्यात मनोबल उंचावलेल्या श्रीलंकन टीमसमोर भारताचा कस लागणार हे नक्की. या सामन्यात भारतासाठी अक्षर पटेलची दुखापत ही काहीशी चिंतेची बाब आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी करताना त्याला ही दुखापत झालीय. त्याच्यासाठी राखीव खेळाडू म्हणून अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरला पाचारण करण्यात आलंय. तर, श्रीलंकेचा फिरकीपटू महेश तीक्ष्णा दुखापतीमुळे अंतिम सामन्यात खेळू शकणार नाही. त्याची अनुपस्थितीही लंकन टीमला जाणवू शकते. या सामन्यात पावसाचा व्यत्यय येऊ नये अशी अपेक्षा क्रिकेटरसिक करतायत.
टीम इंडियाची धडाकेबाज कामगिरी
आशिया कपमध्ये भारताची कामगिरी संमिश्र राहिली आहे. ग्रुप स्टेजमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय फलंदाजांचा फ्लॉप शो पाहायला मिळाला. यानंतर टीम इंडियानं नेपाळविरुद्ध शानदार पुनरागमन केलं. चौथ्या फेरीच्या सामन्यात टीम इंडियानं पाकिस्तानचा 228 धावांनी पराभव केला. चौथ्या फेरीच्या सामन्यातही टीम इंडियानं श्रीलंकेचा सहज पराभव केला. त्यानंतर अत्यंत चुरशीच्या सामन्यात टीम इंडियाचा बांगलादेशकडून 6 धावांनी पराभव झाला.
टीम इंडियाला अंतिम फेरीत कोणत्याही प्रकारचा प्रयोग परवडणारा नाही. या सामन्यासाठी विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज सारखे दिग्गज खेळाडू संघात पुनरागमन करणार असल्याची खात्री आहे. उपकर्णधार हार्दिक पांड्यालाही अंतिम फेरीसाठी प्लेईंग 11 मध्ये प्रवेश मिळेल. अक्षर पटेल दुखापतीमुळे बाहेर असेल. खेळपट्टीचे स्वरूप लक्षात घेता टीम इंडिया अंतिम सामन्यात तीन फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरण्याची शक्यता आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -