एक्स्प्लोर

IND vs SL : पिंक बॉल कसोटीत भारताची आघाडीची फळी ढेपाळली, अय्यरची एकाकी झुंज, शेपटावर मदार

India vs Sri Lanka 2nd Test : बंगळुरु येथे सुरु असलेल्या पिंक बॉल कसोटीत भारतीय संघाची तगडी फलंदाजी ढेपाळली आहे. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंतसह सर्वच फलंदाजांनी नांगी टाकली.

India vs Sri Lanka 2nd Test : बंगळुरु येथे सुरु असलेल्या पिंक बॉल कसोटीत भारतीय संघाची तगडी फलंदाजी ढेपाळली आहे. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंतसह सर्वच फलंदाजांनी नांगी टाकली. परिणामी 150 धावांच्या आतमध्ये भारताचा निम्मा संघ माघारी परतला होता. बातमी लिहिण्यापर्यंत 183 धावांमध्ये भारताचे सात फलंदाज तंबूत परतले होते. श्रेयस अय्यर 37 धावा काढून मैदानावर आहे. आता सर्व मदार श्रेयस अय्यर आणि तळाच्या फंलदाजांवर आहे. सध्या भारतीय संघाने 48 षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात 204 धावा चोपल्या आहेत. श्रेयस अय्यर 50 तर अक्षर पटेल सहा धावांवर खेळत आहेत.

दिवसरात्र कसोटी सामन्यात कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मयांक अग्रवाल आणि कर्णधार रोहित शर्मा यांना भारताला चांगली सुरुवात देता आली नाही. मयांक अग्रवाल धावबाद झाला. त्यानंतर रोहित शर्माही लगेच माघारी परतला. मयांकने चार तर रोहित शर्माने 15 धावा केल्या. हनुमा विहारी आणि विराट कोहली ही जोडी जमेल असे वाटत असतानाही पुन्हा एकदा लंकेच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत भारताला लागोपाठ धक्के दिले. हनुमा विहारी 31 तर विराट कोहली 23 धावा करुन माघारी परतले. लागोपाठ विकेट पडत असताना मैदानावर आलेल्या ऋषभ पंत याने विस्फोटक फलंदाजी केली. मात्र, पंतनेही विकेट फेकली. पंत 26 चेंडूत 39 धावा करुन माघारी परतला. त्यानंतर आलेल्या जाडेजा आणि अश्विन यांनाही आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. जाडेजा 4 तर अश्विन 15 धावांवर माघारी परतले. सध्या श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल मैदानावर आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुच्या गृहमैदानावर म्हणजेच एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर विराट कारकीर्दीतील ‘शतकदुष्काळ’ संपवेल अशी क्रिकेटचाहत्यांना आशा होती. मात्र, विराट कोहलीने पुन्हा एकदा निराशा केली. चांगल्या सुरुवातीनंतर विराट कोहली बाद झाला. विराट कोहली बाद झाल्यानंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा विराट कोहलीच्या शतकांची चर्चा सुरु झाली आहे.

भारताचा कसोटी संघ:
मयंक अग्रवाल, रोहित शर्मा (कर्णधार), हनुमा विहारी, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह.

श्रीलंकेचा कसोटी संघ
दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), लाहिरू थिरिमाने, कुसल मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, धनंजया डी सिल्वा, चरिथ असलंका, निरोशन डिकवेला (विकेटकीपर), सुरंगा लकमल, लसिथ एम्बुल्डेनिया, विश्व फर्नांडो, प्रवीण जयविक्रमा

महत्त्वाच्या बातम्या

IND vs ENG 2nd ODI: कुलदीप यादव IN, गुरनूर ब्रार OUT...; इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेसाठी अशी असेल टीम इंडियाची Playing XI
कुलदीप यादव IN, गुरनूर ब्रार OUT...; इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेसाठी अशी असेल टीम इंडियाची Playing XI
ICC :  वनडे वर्ल्ड कप 2027 मध्ये भारत- पाकिस्तान तीन वेळा आमने सामने? आयसीसीनं फॉरमॅट बदताच क्रिकेटप्रेमींनी संभाव्य समीकरण शोधून काढलं
वनडे वर्ल्ड कप 2027 मध्ये भारत- पाकिस्तान तीन वेळा आमने सामने? आयसीसीनं फॉरमॅट बदलताच क्रिकेटप्रेमींनी अंदाज बांधला
ICC : वनडे वर्ल्ड कप आणि टी 20 वर्ल्ड कपचा फॉरमॅट बदलला, आयसीसीचा मोठा निर्णय, सुपर-7,  सुपर -10 सह एलिमिनेटरचा समावेश
वनडे वर्ल्ड कप आणि टी 20 वर्ल्ड कपचा फॉरमॅट बदलला, आयसीसीचा मोठा निर्णय, सुपर-7,  सुपर -10 सह एलिमिनेटरचा समावेश
Shubman Gill : शुभमन गिलकडे वनडे रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचण्याची संधी, सध्या गिल दुसऱ्या स्थानी, टॉपवर कोण?
शुभमन गिल दुसऱ्या वनडेत आयसीसी रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचणार? कॅप्टन गिलकडे मोठी संधी

व्हिडीओ

NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virar News: विरारच्या अर्नाळा समुद्रकिनारी चार अल्पवयीन मुलं बुडाली; दोघांना वाचवण्यात यश, दोघांचा शोध सुरू
विरारच्या अर्नाळा समुद्रकिनारी चार अल्पवयीन मुलं बुडाली; दोघांना वाचवण्यात यश, दोघांचा शोध सुरू
सुनेत्रावहिनी अन् पार्थ पवारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न; अमोल मिटकरींचा दावा, मुख्यमंत्री भेटीनंतर वाद
सुनेत्रावहिनी अन् पार्थ पवारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न; अमोल मिटकरींचा दावा, मुख्यमंत्री भेटीनंतर वाद
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज तब्बल 19 वा दिवस; तब्बल 9 किलो वजन घटलं, थकलेला देह पाहून हळहळ, प्रकृती खालावल्याने जीव धोक्यात
सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज तब्बल 19 वा दिवस; तब्बल 9 किलो वजन घटलं, थकलेला देह पाहून हळहळ, प्रकृती खालावल्याने जीव धोक्यात
Sonam Wangchuk: 'प्रत्येक नागरिकाचं जीवन मौल्यवान, संरक्षणसाठी सर्वतोपरी प्रयत्न ही सरकारची जबाबदारी..' दिल्ली हायकोर्टाकडून सोनम वांगचुक यांच्या खालावलेल्या प्रकृतीवर चिंता
'प्रत्येक नागरिकाचं जीवन मौल्यवान, संरक्षणसाठी सर्वतोपरी प्रयत्न ही सरकारची जबाबदारी..' दिल्ली हायकोर्टाकडून सोनम वांगचुक यांच्या खालावलेल्या प्रकृतीवर चिंता
Lionel Messi Viral Video: इंग्रंजाना डिवचण्याचा नाद पुन्हा एकदा भलताच अंगलट आला! तेव्हा युवराजनं हिसका दाखवला आता मेस्सीकडून टप्प्यात घेत करेक्ट कार्यक्रम
Video: इंग्रंजाना डिवचण्याचा नाद पुन्हा एकदा भलताच अंगलट आला! तेव्हा युवराजनं हिसका दाखवला आता मेस्सीकडून टप्प्यात घेत करेक्ट कार्यक्रम
Argentina vs England FIFA World Cup Semi Final: अर्जेंटिनाची सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकपमध्ये धडक, मेस्सीचा 'गोल्डन' पास अन् शेवटच्या सात मिनिटांत दोन गोल; इंग्लंड ठरला 'चोकर्स'!
अर्जेंटिनाची सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकपमध्ये धडक, मेस्सीचा 'गोल्डन' पास अन् शेवटच्या सात मिनिटांत दोन गोल; इंग्लंड ठरला 'चोकर्स'!
Iran War Live Update: इराण आणि अमेरिकेमध्ये घनघोर संघर्ष सुरूच; इराणचा प्रत्युत्तरात जाॅर्डन, बहरीन, कुवेतवर ड्रोन मिसाईलने हल्ला, मोठ्या लष्करी संघर्षासाठी तयार असल्यााचा गर्भित इशारा
इराण आणि अमेरिकेमध्ये घनघोर संघर्ष सुरूच; इराणचा प्रत्युत्तरात जाॅर्डन, बहरीन, कुवेतवर ड्रोन मिसाईलने हल्ला, मोठ्या लष्करी संघर्षासाठी तयार असल्यााचा गर्भित इशारा
Vinayak Raut: अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीपूर्वी विनायक राऊतांना झटका, अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाचा नकार; नेमकं काय घडलं?
अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीपूर्वी विनायक राऊतांना झटका, अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाचा नकार; नेमकं काय घडलं?
Embed widget