India vs Sri Lanka 2nd T20 : मंगळवार, 27 जुलै रोजी कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियममध्ये टीम इंडिया आणि श्रीलंका क्रिकेट संघ पुन्हा एकदा मैदानात आमने-सामने येणार आहेत. हा सामना भारतीय वेळेनुसार, रात्री आठ वाजता खेळवण्यात येईल. शिखर धवनच्या नेतृत्त्वात खेळणारी टीम इंडिया या सामन्यात विजय मिळवत टी20 मालिका जिंकण्यासाठी प्रयत्नशील असेल. तसेच श्रीलंकेचा संघ टीम इंडियावर मात करत मालिकेत टिकून राहण्यासाठी प्रयत्न करताना दिसणार आहे.
भारताने पहिल्या टी20 मध्ये श्रीलंकेचा 38 धावांनी पराभव केला होता. अशातच टीम इंडिया पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी मेदानावर खेळताना दिसणार आहे. दरम्यान, श्रीलंकेच्या संघानं तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा पराभव करुन सिद्ध केलं आहे की, ते पलटवार करण्यासाठीही सक्षम आहेत.
एक बदल घडवून आणू शकते श्रीलंकेचा संघ
पहिल्या टी20 मिडिल ऑर्डरमध्ये फलंदाज एशेन बंडारानं 19 चेडूंमध्ये केवळ 9 धावाच केल्या होत्या. बंडाराच्या संथ खेळीमुळं त्याच्यासोबत भागीदारी करणारा फलंदाज चरिथ असालंका दबावात खेळत होता. असालंका 26 चेडूंमध्ये 44 धावा करुन माघारी परतला. त्यानंतर मात्र श्रीलंकेचा संघ फारशी चांगली कामगिरी करु शकला नाही. या सामन्यात श्रीलंकेला पराभवाचा सामना करावा लागला. अशातच कर्णधार दसून शनाका दुसऱ्या टी20 मध्ये एशेन बंडाराच्या जागी भानुका राजापक्षेला संधी देताना दिसण्याची शक्यता आहे. राजापक्षेनं तिसऱ्या वनडेमध्ये 65 धावा करत संघाला विजय मिळवून दिला होता.
काही महत्त्वाच्या बाबी :
श्रीलंकेनं गेल्या काही दिवसांत पाच टी20 सामने गमावले आहेत.
2017/18 सीझननंतर सूर्यकुमार यादवनं 87 टी20 मध्ये 38.50 सरासरीनं 2772 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याचा 20 अर्धशतक आणि नाबाद 94 चा सर्वाधिक स्कोर आहे.
आजच्या सामन्यासाठी संभाव्य संघ :
श्रीलंका टीम : अविष्का फर्नांडो, मिनोद भानुका (विकेटकीपर), धनंजय डी सिल्वा, चरित असालंका, अशेन बंडारा, दासुन शनाका (कर्णधार), वनिन्दु हसरंगा, चमिका करुणारत्ने, इसुरु उदाना, दुष्मंथा चमीरा, अकिला धनंजय, भानुका जयरत्ने, ईशान बिनुरा फर्नांडो, रमेश मेंडिस, कसुन रजिता, लाहिरू कुमारा, असिथा फर्नांडो, लक्षन संदाकन, प्रवीण जयविक्रमा, धनंजय लक्षन, पथुम निसानका, लाहिरु उदारा, शिरन फर्नांडो
टीम इंडिया : पृथ्वी शॉ, शिखर धवन (कर्णधार), संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, कुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, युजवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, मनीष पांडे, कुलदीप यादव, कृष्णप्पा गौतम , नीतीश राणा, नवदीप सैनी, रुतुराज गायकवाड़, राहुल चाहर, देवदत्त पडिक्कल, चेतन सकारिया.
महत्त्वाच्या इतर बातम्या :