IND vs SL T-20 : काही दिवसांपूर्वी भारताने वेस्ट इंडीज (IND vs WI) संघाला आधी एकदिवसीय आणि नंतर टी20 मालिकेत व्हाईट वॉश दिला. त्यानंतर आता भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्यात भारताने श्रीलंकेवर (Sri Lanka Team) 62 धावांनी विजय मिळवला आहे. त्यानंतर आता दुसरा टी -20 सामना 26 फेब्रुवारीला धर्मशाला याठिकाणी होणार आहे. यामध्ये प्रथमच सामन्यांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. 


धर्मशाला येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर 26 फेब्रुवारीला टी-20 सामना होणार आहे. या सामन्यासाठी विशेष सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. सुरक्षा व्यवस्थेसाठी ड्रोनद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे. सामन्यादरम्यान 4 ते 5 ड्रोनची मदत घेतली जाणार असल्याची माहिती कागरा खुशाल शर्मा यांनी दिली. स्टेडियम आणि आजूबाजूच्या परिसरात ड्रोनद्वारे संपूर्ण पाळत ठेवली जाणार आहे.


पार्किंगच्या ठिकाणांवरही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. जेणेकरून वाहन चोरीला जाण्याची शक्यता राहणार नाही. याच सामन्यात कांगडा जिल्ह्याव्यतिरिक्त इतर जिल्ह्यातील सुमारे 850 पोलीस कर्मचारी देखील कर्तव्यासाठी तैनात करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. एसपी कांगडा जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक डॉ. खुशाल शर्मा म्हणाले की, खेळाडू, व्हीव्हीआयपी आणि प्रेक्षक यांच्या सुरक्षेसोबत पोलीस वाहतूक व्यवस्था सुधारण्याचे काम करतील. या सामन्यासाठी शहराची विभागणी 19 सेक्टरमध्ये करण्यात आली असून, प्रत्येक सेक्टरमध्ये राजपत्रीत अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उप-सेक्टर आणि पोलिस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. धर्मशाला या ठिकाणी दोन टी 20 सामने खेळवले जाणार आहेत. त्यानंतर तेथून संघ मोहालीला रवाना होआल. तिथे पहिला कसोटी सामना 4 मार्चपासून खेळवला जाईल, तर दुसरा कसोटी सामना 12 मार्चपासून बेंगळुरूमध्ये खेळवला जाईल. 


महत्त्वाच्या बातम्या: