IND vs SL, 1st T20 : टीम इंडिया एकापाठोपाठ एक विजय संपादन करत आहे. वेस्ट इंडिजला 3-0 च्या फरकाने धूळ चारल्यानंतर श्रीलंकाविरोधातील पहिल्या सामन्यात विजय मिळवला. एकीकडे संघ दमदार कामगिरी करत असताना खेळाडू दुखापतग्रस्त होत आहेत. आता सलामी फलंदाज ऋतुराज गायकवाड दुखापतग्रस्त झाल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, ऋतुराज गायकवाडच्या जागी सलामी फलंदाज मयांक अग्रवाल याला संधी देण्यात आला आहे. मयांकला बॅकअप सलाम फलंदाज म्हणून बोलवण्यात आले आहे. 26 फेब्रुवारी आणि 27 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सामन्यासाठी मयांक टीम इंडियात दाखल झाला आहे.
श्रीलंकाविरोधातील पहिल्या सामन्यात ऋतुराज गायकवाडला प्लेईंग 11 मध्ये जागा मिळणार होती. पण दुखापतीमुळे त्याला संघाबाहेर बसवण्यात आले. कर्णधार रोहित शर्माने याबाबतची माहिती दिली होती. मनगटाच्या दुखापतीमुळे ऋतुराज गायकवाड श्रीलंका विरोधातील मालिकेतून माघार घेतली आहे.
भारतीय संघाला दुखापतीचे ग्रहण -
ऋतुराज गायकवाडआधी दुखापतीमुळे उपकर्णधार के.एल राहुल आणि वॉशिंगटन सुंदर श्रीलंका मालिकेला मुकले आहेत. त्यानंतर सुर्यकुमार यादव आणि दीपक चाहरला दुखापतीमुळे मालिका अर्ध्यावर सोडावी लागली होती.
कुठे खेळवला जाणार सामना?
आजचा दुसरा टी-20 सामना हिमाचल प्रदेशमधील धर्मशाला मैदानात खेळवला जाणार आहे.
कधी खेळवला जाणार सामना?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी20 सामना आज (25 फेब्रुवारी) सायंकाळी 7 वाजता खेळवला जाणार आहे.
भारत संघ (India T20I Squad)
रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेटकिपर), संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, रवींद्र जाडेजा, वेंकटेश अय्यर, दीपक हुडा, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल
श्रीलंका संघ (Sri Lanka T20I squad)
दसुन शनाका (कर्णधार), पथुम निसानका, कुसल मेन्डिस, चरित असलांका (उपकर्णधार), दिनेश चांदीमल, कामिल मिशारा, जेफरी वॅनडर्से, जनिथ लियानागे, चमिका करुणारत्ने, दुष्मंथा चमीरा, लाहिरू कुमारा