IND vs SA ODI Squad: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उर्वरित दोन एकदिवसीय मालिकेसाठी अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीनं दीपक चहरच्या जागी वॉशिंग्टन सुंदरची निवड केलीय. इंदूरमध्ये खेळण्यात आलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम टी-20 सामन्यात दीपक चाहरच्या पाठीला दुखापत झाली. ज्यामुळं लखनऊ येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातही दीपक चाहर भारताच्या प्लेईंग इलेव्हनचा भाग नव्हता. दीपक चाहर एनसीएमध्ये परत जाईल आणि तेथील वैद्यकीय पथक त्याच्यावर देखरेख ठेवेल.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला 9 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना 9 ऑक्टोबर 2022 रोजी रांची येथे खेळला जाणार आहे. तर, 11 ऑक्टोबर 2022 रोजी नवी दिल्ली येथे मालिकेतील अंतिम एकदिवसीय सामना खेळेल.
ट्वीट-
भारताचा एकदिवसीय संघ:
शिखर धवन (कर्णधार), रुतुराज गायकवाड, शुभमन गिल, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, आवेश खान, मोहम्मद. सिराज, वॉशिंग्टन सुंदर.
दुखापतींनी भारताचं टेन्शन वाढवलं
गुडघ्याच्या दुखापतीमुळं भारताचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जाडेजा टी-20 विश्वचषकातून बाहेर पडला. या धक्क्यातून भारतीय संघ सावरला नाही तोच जसप्रीत बुमराहच्या दुखापतीनं भारतीय संघाच्या अडचणीत वाढ केलीय. सुरुवातील जसप्रीत बुमराहची दुखापत किरकोळ असल्याचं सांगितलं गेलं. परंतु, काही दिवसानंतर त्याला विश्वचषकातून विश्रांती देण्याची बीसीसीआयनं घोषणा केली. यामुळं दीपक चाहरच्या दुखापतीनं भारतीय संघाचं टेन्शन वाढवलंय. दीपक चाहरची टी-20 विश्वचषकाच्या भारतीय संघात राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आलीय. जसप्रीत बुमराहच्या दुखपतीनंतर भारताच्या प्लेईंगमध्ये स्थान मिळवणाऱ्या गोलदांजांच्या यादीत दीपक चाहरचंही नाव आहे.
हे देखील वाचा-