John Campbell: वेस्ट इंडिजचा फलंदाज जॉन कॅम्पबेलवर डोपिंगविरोधी नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल चार वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. जमैका अँटी-डोपिंग कमिशननं  (JADCO) ही कारवाई केलीय. तीन सदस्यीय स्वतंत्र पॅनेलने शुक्रवारच्या 18-पानांच्या निर्णयात कॅम्पबेलवर नमुना संकलन सादर करण्यास टाळाटाळ किंवा नकार देणे किंवा अयशस्वी झाल्याचा आरोप करण्यात आलाय.

वेस्ट इंडिजकडून 20 कसोटी, 6 एकदिवसीय आणि 2 टी-20 सामने खेळलेल्या कॅम्पबेलवर यापूर्वी एप्रिलमध्ये कॅम्पबेलनं किंग्स्टन येथील त्याच्या घरी रक्ताचा नमुना देण्यास नकार दिला होता. त्यानं जमैका अँटी-डोपिंग कमिशनचा नियम 2.3 मोडला आहे, असा आरोप करण्यात आला होता. जमैका अँटी-डोपिंग कमिशनच्या नियम 2.3 चे उल्लंघन केल्याबद्दल कॅम्पबेलवर 4 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. कॅम्पबेलवरील ही बंदी 10 मे पासून विचारात घेतली जाईल.

कॅम्पबेल अवस्मरणीय खेळी
कॅम्पबेलनं वेस्ट इंडिजसाठी 20 कसोटी, 6 एकदिवसीय आणि 2 टी-20 सामने खेळले आहेत. कॅम्पबेलची एक विस्फोटक खेळी आजही क्रिकेट चाहत्यांच्या लक्षात आहे. त्यानं 2019 मध्ये डब्लिनमध्ये आयर्लंडविरुद्ध 179 धावांची स्फोटक खेळी खेळली होती. कॅम्पबेलनं आपल्या खेळीत 15 चौकार आणि 6 षटकार मारले. त्याने शाई होपसोबत 365 धावांची विक्रमी भागीदारी केली होती. दोघांनी मिळून एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठी भागीदारी करण्याचा विश्वविक्रम रचला होता.

कॅम्पबेलची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

प्रकार सामने डाव धावा सर्वोच्च धावसंख्या एव्हरेज स्ट्राईक रेट शतक अर्धशतक
कसोटी 20 40 888 68 26.11 52.17 0 3
एकदिवसीय 6 5 248 179 49.60 115.88 1 0
टी-20 2 2 11 11 5.50 68.75 0 0

हे देखील वाचा-