U19 Asia Cup 2024 Full Schedule : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. दोन्ही संघांमधील सामन्यात वातावरण काही वेगळेच असते. आता पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान भिडणार आहे. 19 वर्षाखालील आशिया कप 2024 29 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. यामध्ये एकूण आठ संघ सहभागी होत आहेत. टीम इंडिया अ गटात आहे. यासोबतच पाकिस्तान, यूएई आणि जपानलाही गटात ठेवण्यात आले आहे. बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि नेपाळ यांना ब गटात ठेवण्यात आले आहे.


भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना दुबईत होणार


या सामन्याच्या तारीखा समोर आली आहे. अंडर-19 आशिया कप 2024 चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यावेळी स्पर्धेतील पहिला सामना बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्यात होणार आहे. तर दुबईत भारत आणि पाकिस्तान यांच्यात 30 नोव्हेंबरला सामना होणार आहे. या स्पर्धेतील अंडर 19 टीम इंडियाचा हा पहिला सामना असेल. यानंतर भारताचा सामना यूएई आणि जपानशी होणार आहे.






टीम इंडियाचा दुसरा गट सामना जपानविरुद्ध आहे जो 2 डिसेंबर रोजी शारजाह येथे खेळला जाईल. भारत आणि यूएई यांच्यातील सामना 4 डिसेंबर रोजी होणार आहे. हा सामनाही शारजाह येथे होणार आहे.


8 डिसेंबर रोजी दुबईत अंतिम सामना -


अंडर 19 आशिया कप 2024 चा अंतिम सामना 8 डिसेंबर रोजी दुबईत होणार आहे. याआधी 6 डिसेंबरला पहिला उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. हा सामना दुबईत होणार आहे. दुसरा उपांत्य सामनाही 6 डिसेंबर रोजी होणार आहे. पण तो शारजाहमध्ये खेळवला जाईल.


गेल्या वेळी भारताची कामगिरी अशी होती 


2023 च्या अंडर-19 आशिया कपमध्ये टीम इंडियाची चमकदार कामगिरी पाहायला मिळाली. भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचला होता. मात्र, येथे बांगलादेशने 4 गडी राखून पराभूत केले. बांगलादेश आणि यूएई यांच्यात अंतिम सामना झाला. बांगलादेशने 195 धावांनी विजय मिळवला. राज लिंबानीने भारतासाठी घातक गोलंदाजी केली होती. तो या स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. राजने 4 सामन्यात 12 विकेट घेतल्या होत्या.


हे ही वाचा -


SA vs Ind 1st T20I : द. आफ्रिकेने नाणेफेक जिंकली, कर्णधार सूर्याने 'या' खेळाडूंना दिली संधी, जाणून घ्या प्लेइंग-11