एक्स्प्लोर

IND vs PAK Women World Cup LIVE Score : भारतीय महिला संघाचा पाकिस्तानवर 107 धावांनी दणदणीत विजय

IND vs PAK Women World Cup LIVE Score : भारत विरुद्ध पाकिस्तान महिला टी-20 वर्ल्ड कप सामना, पाहा सामन्या संदर्भातील लाईव्ह अपडेट एका क्लिकवर...

LIVE

Key Events
IND vs PAK Women World Cup LIVE Score : भारतीय महिला संघाचा पाकिस्तानवर 107 धावांनी दणदणीत विजय

Background

IND vs PAK Women World Cup LIVE Score : भारत आणि पाकिस्तान (भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामना) कोणत्याही खेळात समोरासमोर आले तरी संपूर्ण जगाच्या नजरा त्याकडेच असतात. विशेषत: जेव्हा सामना विश्वचषकातील असतो, तेव्हा त्याची उत्कंठा शिगेला असते. भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा मैदानावर आमने-सामने येणार असून यावेळी दोन्ही देशांच्या महिला एकमेकांविरुद्ध मैदानात उतरतील. सध्या सुरु असलेल्या महिला विश्वचषक 2022 (Womens world cup 2022) स्पर्धेत भारत पहिलाच सामना पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. एकदिवसीय विश्वचषक सामन्यात आज दोन्ही संघ एकमेकांशी भिडत आहेत. या सामन्यात भारताने पाकिस्तानविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या महिला विश्वचषक 2022 स्पर्धेला 4 मार्चपासून सुरुवात झाली आहे. आता भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश स्पर्धेची सुरुवात एकमेकांविरुद्ध पहिला सामना खेळत करणार आहेत. दोन्ही देशांतील क्रिकेटप्रेमी या सामन्याची आतुरतेने वाट पाहत असून अनेकांनी या सामन्याबाबत ट्वीट केलं आहे. पुरुष संघाचा माजी कर्णधार विराटनेही महिला संघाला चिअर करण्यासाठी ट्वीट केलं होतं.

या स्पर्धेतील दोन्ही संघांचा हा पहिलाच सामना आहे. त्यामुळे दोन्ही संघ विजयाने सुरुवात करण्याचा प्रयत्न करतील. जर आपण आकडेवारी आणि इतिहास पाहिला तर भारत वरचढ आहे. कारण पुरुषांप्रमाणेच पाकिस्तान महिला संघाला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला पराभूत करता आलेले नाही.

कसा पाहाल सामना?

हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क या चॅनेलवर पाहता येणार आहे. तसंच हॉटस्टार या अॅपवरही हा सामना पाहता येईल.

भारतीय संघ:

मिथाली राज (कर्णधार), तानिया भाटीया (यष्टीरक्षक), झुलन गोस्वामी, हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना, पूनम यादव, राजेश्वरी गायकवाड, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, मेघना सिंह, पुजा वस्त्रकर, रेणुका सिंह, शेफाली वर्मा, रिचा घोष, यस्तीका भाटीया.

पाकिस्तान संघ

 जावेरिया खान, सिद्रा अमीन, बिस्मा मारूफ (कर्णधार), ओमामा सोहेल, निदा दार, आलिया रियाझ, फातिमा सना, सिद्रा नवाज (विकेटकीपर), डायना बेग, नशरा संधू, अनम अमीन

13:28 PM (IST)  •  06 Mar 2022

भारतीय महिला संघानं पाकिस्तानला चारली धूळ, 107 धावांनी दणदणित विजय

भारतीय महिला संघाने पाकिस्तान संघाला चांगलीच धूळ चारली आहे. भारताने 107 धावांनी पाकिस्तानवर दणदणित विजय मिळवला आहे.

12:59 PM (IST)  •  06 Mar 2022

नशरा संधूही शून्यवर बाद

नशरा संधू खाते न उघडताच शून्य धावांवर बाद झाली आहे. पाकिस्तानची धावसंख्या : 121/9 (ओव्हर 38/4)

12:56 PM (IST)  •  06 Mar 2022

फातिमा सना, सिद्रा नवाज एकामागोमाग एक एलबीडब्ल्यू आऊट

पाकिस्तानच्या फातिमा सना, सिद्रा नवाज एकामागोमाग एक एलबीडब्ल्यू आऊट झाल्या आहेत.

12:36 PM (IST)  •  06 Mar 2022

32 ओव्हरनंतर पाकिस्तानच्या 96 धावा, 6 गडी बाद

पाकिस्तान संघाने 32 ओव्हरनंतर 96 धावा केल्या असून त्यांचे 6 गडी बाद झाले आहेत.

12:29 PM (IST)  •  06 Mar 2022

टीम इंडियाकडून पाकिस्तानचा सहावा गडी बाद

राजेश्वरी गायकवाडच्या तुफान गोलंदांजीने पाकिस्तानच्या आलिया रियाजची विकेट घेतली. पाकिस्तानची धावसंख्या : 87/6

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 7 AM :13 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 13 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSpecial Reprot Amit Thackeray : आधी अमित ठाकरेंचा प्रचार आता सरवणकरांचा, तीन सेनेंच्या लढाईत कुणाची बाजी?Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
Embed widget