Asia Cup 2023 : पावसानंतर सामना सुरु झाला तर पाकिस्तानला किती टार्गेट मिळणार?
India vs Pakistan, Asia Cup 2023 : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली.
India vs Pakistan, Asia Cup 2023 : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली. भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात दोन बाद 356 धावांपर्यंत मजल मारली. रविवारी पावसामुळे सामना होऊ शकला नव्हता, आज म्हणजेच राखीव दिवशी पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे सामना उशीरा सुरुवात झाला, पण त्यानंतर विराट आणि राहुल यांनी शतके ठोकली. भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. इमाम उल हक आणि बाबर आझम लगेच तंबूत परतले. पावसामुळे खेळ थांबला तेव्हा पाकिस्तानने दोन बाद 44 धावा केल्या आहेत. कोलंबोमध्ये पावसामुळे प्रेमदासा स्टेडिअमवर कव्हर्स टाकण्यात आले आहेत. सामना सुरु झाला अन् षटके कमी करण्यात आली तर पाकिस्तानला मोठं आव्हान मिळू शकते.
डकवर्थ लुईस नियमांनुसार, जर पाकिस्तान संघाला 20 षटके फलंदाजी करण्याची संधी मिळाली तर 200 धावांचे आव्हान मिळू शकते. म्हणजे, पाकिस्तानला आणखी 9 षटकात 156 धावा कराव्या लागतील. डकवर्थ लुईस नियमांनुसार, पाकिस्तानला 22 षटकात 226 धावांचे आव्हान मिळू शकते. तर 24 षटकानंतर 230, 26 षटकात 244 धावांचे आव्हान मिळू शकते. 25 षटकांमध्ये 237 धावांचे आव्हान मिळू शकते. तर 30 षटकांत 267 धावांचे आव्हान मिळू शकते. 10.30 पर्यंत सामना सुरु झाल्यास 20 षटकांचा सामना होऊ शकतो.
पावसामुळे आजही सामना झाला नाही तर भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघाला प्रत्येकी एक एक गुण दिले जातील. अशा स्थितीत पाकिस्तान संघ फायनलमध्ये पोहचण्याची शक्यता जास्त आहे. पाकिस्तान संघाने सुपर 4 मधील पहिल्या सामन्यात विजय मिळवला होता. त्यांचा अखेरचा सामना श्रीलंकाविरोधात आहे. पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील विजेता संघ फायनलमध्ये प्रवेश करेल.
भारताने दिलेल्या 357 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात निराशाजनक झाली. सलामी फलंदाज इमाम उल हक स्वस्तात बाद झाला. अवघ्या 17 धावांवर पाकिस्तानला पहिला धक्का बसला. त्यानंतर 43 धावसंख्येवर दुसरा धक्का बसला. बाबर आझम याला हार्दिक पांड्याने स्वस्तात तंबूत पाठवले. तर इमामचा अडथळा बुमराहने दूर केला.
Probable targets for Pakistan if overs reduced:
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 11, 2023
30 overs - 267.
25 overs - 237.
20 overs - 200. pic.twitter.com/GytTYLMKOm
कोहली-राहुलची द्विशतकी भागिदारी
शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी शतकी भागिदारी करत पाया रचला. त्यानंतर विराट कोहली आणि केएल राहुल यांनी दमदार फलंदाजी केली. दोघांनी 194 चेंडूमध्ये 233 धावांची भागिदारी केली. विराट कोहली याने 94 चेंडूमध्ये नाबाद 122 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये विराट कोहलीने 9 चौकार आणि तीन षटकार ठोकले. तर केएल राहुल याने 106 चेंडूत 111 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 12 चौकार आणि 2 षटकार ठोकले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)