IND vs NZ 2nd Pune Test Toss and Playing XI: भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील दुसरी कसोटी सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये तीन बदल केले आहेत. केएल राहुल, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादवच्या रूपात तीन बदल झाले. या तिघांच्या जागी आकाश दीप, शुभमन गिल आणि वॉशिंग्टन सुंदरला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे. 






न्यूझीलंड संघात एक बदल करण्यात आला. वेगवान गोलंदाज मॅट हेन्री बोटाच्या दुखापतीमुळे बाहेर पडला. हेन्रीच्या जागी स्पिनर मिचेल सँटनरचा संघात समावेश करण्यात आला. खेळपट्टी लक्षात घेऊन दोन्ही संघांनी गोलंदाजीत जास्तीत जास्त फिरकीपटूंचा समावेश करण्याचा निर्णय घेतला. पुण्याची खेळपट्टी कोरडी दिसते, त्यावर फिरकीपटूंना चांगली मदत मिळू शकते. दरम्यान तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.


नाणेफेकीनंतर न्यूझीलंडचा कर्णधार काय म्हणाला?


नाणेफेक जिंकल्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथम म्हणाला, "गेल्या आठवड्यापेक्षा इथे परिस्थिती खूप वेगळी आहे. बंगळुरुमध्ये फारसे गवत नव्हते. या खेळपट्टीवर फिरकीपटूंना मदत मिळेल, असं दिसतंय. मागील कसोटी सामना जिंकून संघात आत्मविश्वास निर्माण झाला आहे, असंही टॉम लॅथमने सांगितले.


नाणेफेकीनंतर भारतीय कर्णधार काय म्हणाला?


नाणेफेकीनंतर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, "जेव्हा तुम्ही असा कसोटी सामना खेळता, तेव्हा पहिले सत्र आमच्या बाजूने जात नाही. पण आम्ही दुसऱ्या डावात चांगली फलंदाजी केली. त्यातून आम्ही अनेक सकारात्मक गोष्टी घेतो. आम्ही परिस्थिती कशी बदलू शकतो?, यावर विचार केला जातो. कसोटी क्रिकेटमधील पहिली 10 षटके खूप महत्वाची असतात, असं रोहित शर्माने सांगितले.  


पुणे कसोटीसाठी भारताची प्लेईंग इलेव्हन-


यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सरफराज खान, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, जसप्रीत बुमराह.


पुण्याच्या कसोटीसाठी न्यूझीलंडचा प्लेइंग इलेव्हन-


टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, ​​रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, टिम साऊदी, मिचेल सँटनर, एजाज पटेल, विल्यम ओरुके.


संबंधित बातमी:


Sikandar Raza: आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये इतिहास-भूगोल बदलला; विक्रम मोडत झळकावले सर्वात जलद शतक, कोण आहे सिकंदर रझा?