Zimbabwe Registered Highest Score in T20 Cricket : झिम्बाब्वे क्रिकेट संघाने टी-20 आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जे काम केले आहे ते यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात संघासाठी 300 हून अधिक धावा करणे हे स्वप्नापेक्षा कमी नाही, पण आज झिम्बाब्वेने ते सत्यात उतरवले आहे. खरंतर, झिम्बाब्वेने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात मोठी धावसंख्या केली आहे. गॅम्बियाविरुद्धच्या सामन्यात झिम्बाब्वेने 20 षटकांत केवळ 4 गडी गमावून 344 धावा केल्या होत्या. जे यापूर्वी कधीच घडले नव्हते.


झिम्बाब्वेने गॅम्बियाविरुद्धच्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात केल्या 344 धावा


झिम्बाब्वे आणि गॅम्बिया यांच्यातील सामन्यात आश्चर्यकारक घडले. प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वे संघाने 344 धावा केल्या. याआधी, आंतरराष्ट्रीय टी-20मध्ये एकदाच असे घडले होते, जेव्हा एखाद्या संघाने 300 पेक्षा जास्त धावा केल्या. 2023 मध्ये नेपाळ संघाने मंगोलियाविरुद्ध 313 धावा केल्या होत्या. हा विक्रम मोडणार नाही, असे त्यावेळी मानले जात होते, पण आता हा विक्रम मोडीत निघाला आहे. या सामन्यात झिम्बाब्वेच्या तीन फलंदाजांनी अर्धशतके झळकावली आणि याशिवाय सिकंदर रझानेही शतक झळकावले.




सिकंदर रझाने ठोकले तुफानी शतक 


सिकंदर रझाने केवळ 43 चेंडूत 133 धावांची धडाकेबाज आणि स्फोटक खेळी खेळली. या खेळीत सिकंदरने 15 षटकार आणि 7 चौकार ठोकले. झिम्बाब्वेच्या फलंदाजांनी एकाही गोलंदाजाला सोडले नाही आणि जो कोणी येईल त्याला झोडपून काढले. यामुळेच टी-20 इंटरनॅशनलमध्ये सर्वाधिक धावा करण्यात संघाला यश आले आहे.




मुसा जोबार्तेहने 4 षटकांत 93 धावा


आता या डावात केलेल्या इतर विक्रमांबद्दल जाणून घेऊया, गॅम्बियाचा गोलंदाज मोसेस जोबर्टेहने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात महागडा स्पेल टाकले. त्याने आपल्या चार षटकात एकूण 93 धावा दिल्या आणि त्याला एकही विकेट मिळाली नाही. 7 धावा कमी पडला नाय तर, टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजाने 100 धावा देण्याची ही पहिलीच वेळ ठरली असती. मात्र, तरीही मुसा जोबरतेह यांचे नाव रेकॉर्ड बुकमध्ये नोंदवण्यात आले आहे. सिकंदर रझाने अवघ्या 33 चेंडूत आपले शतक पूर्ण केले होते. अशाप्रकारे, तो आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा संयुक्त दुसरा फलंदाज बनला आहे. झिम्बाब्वेने या डावात एकूण 27 षटकार मारले होते, जे टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच घडले.