India vs Ireland T20I : भारतीय संघ आयर्लंडमध्ये दाखल; कधी, कुठे पाहाल टी20 सामने, सर्व माहिती एका क्लिकवर
India Tour Of Ireland 2023 : तीन सामन्याच्या टी 20 मालिकेसाठी भारतीय संघ आयर्लंडमध्ये दाखल झालाय.
India Tour Of Ireland 2023 : तीन सामन्याच्या टी 20 मालिकेसाठी भारतीय संघ आयर्लंडमध्ये दाखल झालाय. भारतीय संघाचे नेतृत्व जसप्रीत बुमराह करत आहे. अनेक दिवसानंतर जसप्रीत बुमराह मैदानावर पुनरागमन करत आहे. चाहते बुमराह याला पुन्हा एकदा खेळताना पाहण्यासाठी उत्सुक असतील. मॅचविनर जसप्रीत बुमराहचे संघातील पुनरागमन आशिया चषक आणि वनडे विश्वचषकासाठी भारतीय संघाच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे. 18 ऑगस्ट रोजी पहिला सामना होणार आहे. भारताच्या आयर्लंड मालिकेतील सर्व माहिती एका क्लिकवर...
कुठे पाहणार लाईव्ह ?
भारत आणि आयर्लंड यांच्यात होणाऱ्या तीन टी20 सामन्याची मालिका भारतात सपोर्ट्स 18 येथे लाईव्ह पाहता येतील. तर जिओ सिनेमा अॅप आणि वेबसाईटकवरही सामन्यांचा आनंद घेता येईल. एबीपी माझाच्या संकेतस्थळावरही सामन्यांसंदर्भात अपडेट मिळेल.
कधी सुरु होणार सामना ?
भारत आणि आयर्लंड यांच्यातील टी 20 सामने रात्री साडेसात वाजता सुरु होणार आहेत. सात वाजता नाणेफेक होईल.
आयर्लंड दौऱ्याचं वेळापत्रक -
भारत आणि आयर्लंड यांच्यामध्ये तीन सामन्याची टी 20 मालिका खेळवण्यात येणार आहे. 18 ऑगस्ट रोजी डबलिन येथे पहिला टी20 सामना होणार आहे. 20 ऑगस्ट रोजी दुसरा आणि 23 ऑगस्ट रोजी तिसरा टी 20 सामना होणार आहे.
दोन्ही संघाचे शिलेदार कोण कोण ?
भारत :
जसप्रीत बुमराह (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उप कर्णधार), यशस्वी जायसवाल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, संजू सॅमसन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), शिवम दुबे, वाशिंगटन सुंदर, शाहबाज अहमद, रवि बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार, आवेश खान.
आयर्लंड :
पॉल स्टर्लिंग (कर्णधार), एंड्रयू बालबर्नी, रॉस एडेयर, हॅरी टेक्टर, गॅरेथ डेलानी, कर्टिस कँफर, जॉर्ज डॉकरेल, फियोन हँड, लोर्कन टकर (विकेटकीपर), मार्क एडेयर, जोशुआ लिटिल, बॅरी मॅकार्थी, थियो वॅन वोर्कॉम, बेंजामिन व्हाइट, क्रेग यंग.
भारताच्या सिनिअर खेळाडूंना आराम -
18 ऑगस्टपासून आयर्लंड दौऱ्याला सुरुवात होणार आहे. भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. दुसरा ट्वेंटी-ट्वेंटी सामना 20 ऑगस्ट रोजी खेळवला जाईल. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 23 ऑगस्ट रोजी होणार आहे. आशिया चषकाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने आयर्लंड दौऱ्यात सर्व मोठ्या खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या, जडेजा, सूर्यकुमार यादव, शुभमन गिल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, सिराज हे मोठे खेळाडू या मालिकेत खेळताना दिसणार नाहीत.