Sanju in Playing 11 : भारतीय संघ आयर्लंडविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या आणि अंतिम सामन्यासाठी सज्ज झाला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय़ भारताने घेतला आहे. दरम्यान यावेळी संघात तीन बदल करत भारतीय संघ मैदानात उतरत आहे. पहिला सामना जिंकून देखील भारताने संघात बदल करण्यामागील कारण दौैऱ्यावरील अधिक खेळाडूंना संधी मिळावी हेच असावं. यावेळी महत्त्वाचं म्हणजे अनुभवी संजू सॅमसनला आज संधी मिळाली आहे. ऋतुराज गायकवाडच्या जागी तो खेळत आहे. तर चहलला विश्रांती देत रवी बिश्नोई संघात आला आहे. याशिवाय आवेश खानच्या जागी हर्षलला अंतिम 11 मध्ये घेतलं आहे.
बीसीसीआयने या दौऱ्यासाठी नवख्या खेळाडूंना संधी देत हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) कर्णधारपद दिलं आहे. तर उमरान मलिक, अर्शदीप सिंह आणि राहुल त्रिपाठी यांना प्रथमच भारतीय संघाचं तिकीट मिळालं. यातील उमरानला पहिल्या सामन्यात संधी मिळाली पण अर्शदीप आणि राहुलला अजूनही संधी मिळाली नव्हती. आज देखील दोघांनाही संधी मिळालेली नाही. पण दुसरीकडे पहिल्या सामन्यात आयपीएल गाजवणाऱ्या संजू सॅमसनला मात्र संघात स्थान मिळालं नव्हतं. यामुळेच त्याचे चाहते कमालीचे भडकले देखील होते. पण आज मात्र संजूला संधी मिळाली आहे.
दोन्ही संघाची अंतिम 11
भारत - ईशान किशन, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, हार्दिक पांड्या (कर्णधार), दिनेश कार्तिक (विकेटकिपर), अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, रवी बिश्नोई, हर्षल पटेल, उमरान मलिक.
आयर्लंड - पॉल स्टर्लिंग, अँड्र्यू बालबर्नी (कर्णधार), मार्क अडायर, हॅरी टेक्टर, गॅरेथ डेलानी, जॉर्ज डॉकरेल, क्रेग यंग, कॉनर ऑफ्लर्ट, अँडी मॅकब्रायन, जोशुवा लिटिल, कोनोर ऑल्फर्ट
हे देखील वाचा -
IND vs IRE, 2nd T20, Toss Update : हार्दिकची टोळी बॅटिंगसाठी सज्ज; नाणेफेक जिंकत निवडली फलंदाजी
Ind vs Eng, 5th Test : 'सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळा', इंग्लंड दौऱ्यावरील खेळाडूंना बीसीसीआयच्या सूचना