IND vs IRE 2nd T20 Playing 11 : पहिल्या सामन्यात आयर्लंडला 7 विकेट्सने मात दिल्यानंतर आज भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध दुसरा टी20 सामना खेळणार आहे. दोन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि अखेरचा सामना आज खेळवला जाणार असून यावेळी कोणत्या खेळाडूंसह भारत खेळेल हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण या दौऱ्यात राहुल त्रिपाठी आणि अर्शदीप यांना संघात घेतलं असून आज अखेर्चया सामन्यात तरी त्यांना संघात स्थान मिळेल का? हे पाहावं लागेल.


आज भारत दुसरा सामना खेळण्यासाठी आयर्लंडविरुद्ध (India vs Ireland) मैदानात उतरेल. बीसीसीआयने या दौऱ्यासाठी नवख्या खेळाडूंना संधी देत हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) कर्णधारपद दिलं आहे. तर उमरान मलिक, अर्शदीप सिंह आणि राहुल त्रिपाठी यांना प्रथमच भारतीय संघाचं तिकीट मिळालं. यातील उमरानला पहिल्या सामन्यात संधी मिळाली पण अर्शदीप आणि राहुलला अजूनही संधी मिळाली नसल्याने आज तरी त्याचं पदार्पण होणार का हे पाहावं लागेल. याशिवाय पहिल्या सामन्यात आयपीएल गाजवणाऱ्या संजू सॅमसनला मात्र संघात स्थान मिळालं नाही. यामुळेच त्याचे चाहते कमालीचे भडकले देखील होते. संजूने भारतासाठी अखेरचा टी20 सामना फेब्रुवारी 2022 मध्ये खेळला होता. तर अखेरचा एकदिवसीय सामना जुलै 2021 मध्ये खेळला होता. त्यानंतर आता आयर्लंड दौऱ्यात तो संघात आहे. पण पहिल्या टी20 सामन्यात संघात ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव आणि दिनेश कार्तिक या फलंदाजांना संधी मिळाली होती. यामध्ये संजूचं नाव नसल्याने त्याचे फॅन्स भडकले होते, आता दुसऱ्या सामन्यात तरी संजूला संधी मिळेल का? हे पाहावे लागेल.


अशी असू शकते संभावित प्लेईंग 11 - ईशान किशन (विकेटकिपर), संजू सॅमसन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), दिनेश कार्तिक, राहुल त्रिपाठी, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, उमरान मलिक.


हे देखील वाचा -