IND vs IRE Live : भारत आणि आयर्लंड (India vs Ireland) यांच्यातील दुसरा टी20 सामना अत्यंत रोमहर्षक झाला. भारताने दिलेलं 226 धावांचे तगडे आव्हान पूर्ण करण्यात आयर्लंडचा संघ केवळ 4 धावांनी कमी पडला. ज्यामुळे दुसरा टी20 सामना भारताने जिंकत मालिकाही 2-0 ने जिंकली आहे. आयर्लंडच्या फलंदाजांनी एक कडवी झुंज देत उत्तम प्रदर्शन घडवलं.
सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर ईशान स्वस्तात तंबूत परतल्यानंतर दीपक हुडा आणि संजू सॅमसन या जोडीने अगदी धमाकेदार फलंदाजी करत चौफेर फटकेबाजी केली. दीपकने 57 चेंडूत 9 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 104 धावा केल्या. तर संजूने 42 चेंडूत 9 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 77 धावा केल्या. पण या दोघांशिवाय इतर खेळाडू मात्र खास कामगिरी करु शकले नाहीत. विशेष म्हणजे भारताने तीन खेळाडू शून्यावर बाद झाले. कार्तिक, अक्षर आणि हर्षल शून्यावर बाद झाले. आयर्लंडकडून मार्कने 3 तर जोशूवा आणि क्रेगने प्रत्येकी 2 विकेट्स घेतले. पण भारताने संजू आणि दीपकच्या खेळीच्या जोरावर 225 धावा स्कोरबोर्डवर लावल्या.
आयर्लंडची कडवी झुंज
226 धावांचं मोठं आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानात आलेल्या आयर्लंडने सुरुवातीपासूनच चांगली कामगिरी सुरु ठेवली. सलामीवीरांनी तब्बल 72 धावांची भागिदारी उभारली. त्यानंतर पॉल 40 धावा करुन बाद झाला. त्यानंतर कर्मधार अँन्ड्रूयने 60 धावांची अप्रतिम खेळी केली. पण नंतर तोही बाद झाला. अखेरच्या काही ओव्हरमध्ये हॅरी टक्टर आणि जॉर्ज यांनी विजयाच्या दिशेने वेगवान आगेकूच केली. पण हॅरी 39 धावा करुन बाद झाला. जॉर्जने नाबाद 34 तर मार्कने नाबाद 23 धावा केल्या पण अखेरच्या षटकात उमरानने आयर्लंडला गरजेच्या असलेल्या 17 धावा करुन न दिल्याने सामना अखेर भारताने जिंकला. यासोबतच मालिकाही 2-0 ने जिंकला आहे.
हे देखील वाचा -
- Highest T20 Partnership : हुडा-सॅमसन जोडीने रचला इतिहास, तुफान फटकेबाजीच्या जोरावर उभारली भारतासाठी सर्वात मोठी टी20 भागिदारी
- Ind vs Eng, 5th Test : 'सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळा', इंग्लंड दौऱ्यावरील खेळाडूंना बीसीसीआयच्या सूचना
- India tour of England : कसोटी सामन्यांसह टी20 आणि वन डेचाही थरार, सामन्यांची वेळ, प्रक्षेपणाच्या चॅनेलसह सर्व माहिती एका क्लिकवर