IND vs IRE : भारत आणि आयर्लंड(India vs Ireland) यांच्या मालिकेतील दुसऱ्या आणि अंतिम सामन्यात भारताच्या दोन्ही युवा खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. दीपक हुडा आणि संजू सॅमसन (Sanju Samson and Deepak Hooda) यांनी एक मोठा विक्रम करत भारतासाठी टी20 क्रिकेटमधील सर्वात मोठी भागिदारी केली आहे. दोघांनी 176 धावांची भागिदारी करत याआधीची रोहित शर्मा आणि केएल राहुल यांची 165 धावांच्या भागिदारीचा रेकॉर्ड मोडला आहे.

सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी सलामीवीप ईशान अवघ्या तीन धावांवर बाद झाला. पण त्यानंतर मात्र दीपक हुडा आणि संजू सॅमसन या जोडीने अगदी धमाकेदार फलंदाजी करत चौफेर फटकेबाजी केली. यावेळी दीपकने अधिक आक्रमकपणे फलंदाजी केली तर संजूने त्याला साथ दिली. दीपकने आधी अर्धशतक पूर्ण केलं, त्यानंतर संजूनेही आक्रमक फलंदाजी करत अर्धशतक पूर्ण केलं. सामन्यात दीपकने आपलं पहिलं वहिलं आंतरराष्ट्रीय टी20 शतक ठोकलं, तर संजूने पहिलं आंतरराष्ट्रीय अर्धशतक ठोकलं. दीपकने 57 चेंडूत 9 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 104 धावा केल्या. तर संजूने 42 चेंडूत 9 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 77 धावा केल्या. दोघांनी केलेली 176 धावांची भागिदारी भारतासाठी टी20 क्रिकेटमध्ये कोणत्याही विकेटसाठी सर्वात मोठी भागिदारी ठरली आहे.

टी20 क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वोच्च भागिदारी

खेळाडू भागिदारी विरुद्ध संघ
संजू सॅमसन आणि दीपक हुडा 176 आयर्लंड (2022)
रोहित शर्मा आणि केएल राहुल 165 श्रीलंका (2017)
रोहित शर्मा आणि शिखर धवन 160 आयर्लंड (2018)
रोहित शर्मा आणि शिखर धवन 158 न्यूझीलंड (2017)

 

हे देखील वाचा - 

IND vs IRE, 2nd T20, Toss Update : हार्दिकची टोळी बॅटिंगसाठी सज्ज; नाणेफेक जिंकत निवडली फलंदाजी

Ind vs Eng, 5th Test : 'सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळा', इंग्लंड दौऱ्यावरील खेळाडूंना बीसीसीआयच्या सूचना

India tour of England : कसोटी सामन्यांसह टी20 आणि वन डेचाही थरार, सामन्यांची वेळ, प्रक्षेपणाच्या चॅनेलसह सर्व माहिती एका क्लिकवर