India vs England Test, LIVE : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात मागील दौऱ्यातील उर्वरीत कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यानंतर इंग्लंडने भेदक गोलंदाजी करत भारताच्या दोन्ही सलामीवीरांनाही स्वस्तात तंबूत धाडलं आहे. त्यात पावसानेही मध्येच हजेरी लावल्याने 20.1 षटकानंतर भारताची स्थिती 53 वर दोन बाद असून पावसामुळे खेळ थांबवण्यात आला आहे.



सध्या सुरु असलेला भारत विरुद्ध इंग्लंड सामना भारताच्या मागील दौऱ्यातील उर्वरीत पाचवा सामना आहे. कोरोनाच्या शिरकावामुळे पुढे ढकलण्यात आलेला हा सामना असून मालिकेत भारत 2-1 ने पुढे आहे. पण या निर्णायक सामन्यात मात्र भारताची सुरुवात खराब झाली आहे. सलामीवीर गिल आणि पुजाराने फलंदाजीला सुरुवात केल्यानंतर सातव्या षटकातच जेम्स अँडरसनने जॅक क्रॉलीमार्फत शुभमनला झेलबाद केलं. गिल 17 धावा करुन तंबूत परतला. त्यानंतर पुजारा आणि विहारी एक चांगली भागिदारी करत असतील असे वाटतानाच पुन्हा 18 व्या षटकात जेम्स अँडरसनने जॅक क्रॉलीमार्फतच पुजाराला झेलबाद केलं. पुजारा 13 धावा करुन बाद झाला. त्यानंतर काही वेळातच पाऊस आल्याने 20.1 षटकानंतर भारतीय संघाच्या 53 धावा झाल्या असून 2 विकेट्स पडल्या असताना खेळ थांबवण्यात आला आहे.  


विजय मिळवणं भारताला अवघड


भारताने 1967 साली सर्वात आधी इंग्लंडविरुद्ध या मैदानात सामना खेळला होता. त्यावेळी भारताचा पराभव झाला. पुढील दरवर्षी जेव्हा-जेव्हा भारत या मैदानात इंग्लंडविरुद्ध मैदानात उतरला त्या-त्या वेळी भारताला पराभव पत्करावा लागला. केवळ 1986 साली सामना अनिर्णीत सुटला होता. त्यानंतरही भारताची पराभवाची मालिका कायम राहिली. भारताने एकूण 7 सामने या मैदानात खेळले असून 6 गमावले असून एक अनिर्णीत सुटला आहे.


हे देखील वाचा-