India vs England Test, LIVE : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातील कसोटी सामन्यात नाणेफेक नुकतीच पार पडली असून इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी कोणते खेळाडू मैदानात उतरतील याचा विचार करता इंग्लंडने आधीच आपले अंतिम 11 खेळाडू जाहीर केले होते. यावेळी जेम्स अँडरसन जो न्यूझीलंडविरुद्ध दुखापतग्रस्त झाला होता, तो पुन्हा संघात परतला आहे.


दुसरीकडे भारताने कोणते खेळाडू खेळवणार हे नुकतच जाहीर केलं आहे. यावेळी अनुभवी रवीचंद्रन आश्विनला संघात घेण्यात आलेलं नाही. पण अष्टपैलू रवींद्र जाडेजा आणि त्याच्या जोडीला शार्दूल ठाकूर संघात आहे. गोलंदाजांचा विचार करता कर्णधार बुमराहसह, सिराज-शमी जोडी भारताचा बोलिंग अटॅक सांभाळेल. तर सलामीला गिल-पुजारा असणार आहेत. नंतर विहारी, कोहली, पंत आणि श्रेयस अय्यर असतील. तर नेमका भारतीय संघ कसा आहे पाहूया...


भारताचे अंतिम 11 : चेतेश्वर पुजारा, शुभमन गिल, हनुमा विहारी, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकिपर), रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह (कर्णधार), मोहम्मद सिराज.  



कसे आहेत इंग्लंडचे अंतिम 11 


अॅलेक्स ली, जॅक क्राउली, ओली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), सॅम बिलिंग्स (यष्टीरक्षक), मॅथ्यू पॉट्स, स्टुअर्ट ब्रॉड, जॅक लीच, जेम्स अँडरसन.


बर्मिंगमहमध्ये विजय अवघड


भारताने 1967 साली सर्वात आधी इंग्लंडविरुद्ध या मैदानात सामना खेळला होता. त्यावेळी भारताचा पराभव झाला. पुढील दरवर्षी जेव्हा-जेव्हा भारत या मैदानात इंग्लंडविरुद्ध मैदानात उतरला त्या-त्या वेळी भारताला पराभव पत्करावा लागला. केवळ 1986 साली सामना अनिर्णीत सुटला होता. त्यानंतरही भारताची पराभवाची मालिका कायम राहिली. भारताने एकूण 7 सामने या मैदानात खेळले असून 6 गमावले असून एक अनिर्णीत सुटला आहे.


हे देखील वाचा-