India vs England, 2nd T20I : भारत आणि इंग्लंड (India Vs England) यांच्यात सध्या पाच सामन्यांची टी-20 मालिका चालू आहे. या मालिकेतील दुसरा सामना आज चेन्नईतील चेपॉक मैदानावर खेळवण्यात आला. या दुसऱ्या सामन्यात भारताने इंग्लंडवर निसटता विजय मिळवला. भारताला 13 चेंडूंमध्ये 13 धावा काढायच्या होत्या. तिलक वर्माच्या जोरदार फलंदाजीमुळे भारताला इंग्लंडने उभारलेली धावसंख्या गाठता आली.
भारताच्या तिलक वर्माने तारलं
सामन्याच्या सुरुवातीला सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर इंग्लंडने भारतापुढे विजयासाठी 166 धावांचे लक्ष्य ठेवले. ही धावसंख्या गाठताना भारताचाल बरीच मेहनत घ्यावी लागली. कारण सलामीचे संजू सॅमसन आणइ अभिषेक शर्मा हे फार काही कमाल करू शकले नाहीत. त्यांनी अनुक्रमे 5 आणि 12 धावा केल्या. त्यानंतर मात्र फलंदाजीसाठी आलेल्या तिलक वर्माने मात्र मैदानात धवांचा पाउस पाडला. तो शेवटपर्यंत मैदानावर टीकून होता. त्याने 72 (नाबाद) धावा केल्या. कर्णधार सूर्यकुमारही अवघ्या 12 धावा करून तंबूत परतला. तर धु्रव जुरेल आणि हार्दिक पांड्या यांनी अनुक्रमे 4 आणि 7 धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदरने 26 धावा करत तिलक वर्माला चांगली साथ दिली. त्यानंतर मात्र शेवटच्या फळीतील अक्षर पटेल (2), अर्षदीप सिंग (6) रवी बिश्नोई (9 नाबाद) फार काही धावा करू शकले नाहीत. मात्र तिलक वर्माच्या तुफानी फलंदाजीमुळे भारताला सामना जिंकता आला.
इंग्लंडचे फलंदाज ढेपाळले
तत्पूर्वी सूर्याचा गोलंदाजी करण्याचा निर्णय काहीसा यशस्वी झाला. कारण इंग्लंडच्या एकाही खेळाडूला 45 पेक्षा अधिक धावा करता आल्या नाहीत. फलंदाजीसाठी आलेले साल्ट आणि डकेट हे अवघ्या चार आणि तीन धावांवर बाद झाले. त्यानंतर जोस बटलर याने इंग्लंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र तो 45 धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर मात्र इंग्लंडचे फलंदाज फार काही चांगली कामगिरी करू शकले नाही. हॅरी ब्रुक आणि लिव्हिंगस्टोन यांनी प्रत्येकी 13 धावा केल्या. तर जॅमी स्मीथ याने 22 धावा केल्या. जॅमी ओव्हरटोन फक्त पाच धावा करू शकला. ब्रायडन कार्स याने मैदानावर टिकूण राहण्याचा प्रयत्न केला. मात्र तो फक्त 31 धावा करू शकला. जोफ्रा आर्चर (12), जोफ्रा आर्चर (10) मार्क वुड (5) हे शेवटच्या फळीतील खेळाडू लगेच परतले.
हेही वाचा :
वणव्यामध्ये गारवा! रणजीत मुंबईचा पराभव, पण 'मुंबईकर' रोहितला मात्र मिळाली गुड न्यूज