England Men name XI for first Test with India : भारत आणि इंग्लंड ( Ind vs Eng 1st Test ) यांच्यामध्ये 25 जानेवारीपासून पाच सामन्याच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. गुरुवारी  भारत आणि इंग्लंड हैदराबादच्या मैदानात भिडणार आहे. त्याआधीच आज इंग्लंडच्या प्लेईंग 11 ची घोषणा करण्यात आली आहे. बेन स्टोक्सच्या नेतृत्वातील इंग्लंडचे 11 शिलेदार जाहीर करण्यात आले आहेत. जेम्स अँडरसन याला इंग्लंडच्या प्लेईंग 11 मध्ये स्थान देण्यात आले नाही. जेम्स अँडरसन इंग्लंडचा सर्वात अनुभवी गोलंदाज आहे. इंग्लंडच्या संघात चार स्पेशालिस्ट फिरकी गोलंदाज आहेत. 


चार फिरकी गोलंदाज - 


हैदराबादच्या मैदानात फिरकी गोलंदाजांना साथ मिळेल असा अंदाज होता. त्यानुसार इंग्लंड संघाने आपल्या संघात चार फिरकी गोलंदाजांना स्थान दिले आहे. ओली पोप, बेन फॉक्स, रेहान अहमद आणि जैक लीच फिरकीची धुरा संभाळतील. त्याशिवाय लंकाशायरचा टॉम हार्टले भारताविरोधात पदार्पण करण्यास सज्ज झालाय. 





जेम्स अँडरसनला स्थान नाही - 


पहिल्या कसोटी सामन्यात जेम्स अँडरसन याला स्थान देण्यात आले नाही. जेम्स अँडरसन याचा हा सातवा भारत दौरा आहे. आतापर्यंत त्याने भारतात 13 कसोटी सामने खेळले आहेत, यामध्ये त्याने34 विकेट घेतल्या आहे. 2012 च्या कसोटी मालिकेत त्याने महत्वाची भूमिका बजावली होती. धोनीच्या नेतृत्वातील भारतीय संघाचा 2-1 ने पराभव केला होता. त्या मालिकेत अँडरसन याने 12 विकेट घेतल्या होत्या. दरम्यान, जेम्स अँडरसन याने 183 कसोटी सामन्यात 690 विकेट घेतल्या आहेत.


पहिल्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडची प्लेईंग 11 - 


बेन स्टोक्स (कर्णधार), रेहान अहमद, जॉनी बेयरस्टो (विकेटकीपर), शोएब बशीर, जॅक क्रॉली, बेन फॉक्स (विकेटकीपर), टॉम हार्टले, जॅक लीच, ओली पोप, जो रूट आणि मार्क वूड. 


England Men's XI


1. Zak Crawley
2. Ben Duckett
3. Ollie Pope
4. Joe Root
5. Jonny Bairstow
6. Ben Stokes (C)
7. Ben Foakes
8. Rehan Ahmed
9. Tom Hartley
10. Mark Wood
11. Jack Leach


इंग्लंडविरोधातील पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया  -
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जायस्वाल, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उप कर्णधार), आवेश खान, रजत पाटीदार


भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्याच्या कसोटी मालिकेचं वेळापत्रक -  
पहिला टेस्ट: भारत vs इंग्लंड, 25-29 जानेवारी, हैदराबाद (राजीव गांधी इंटरनेशनल स्टेडियम)
दुसरा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 2-6 फेब्रुवारी, विशाखापट्टणम (डॉ. वाईएस राजशेखर क्रिकेट स्टेडियम)
तिसरा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 15-19 फेब्रुवारी, राजकोट (सौराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम)
चौथा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 23-27 फेब्रुवारी, रांची (जेएससीए इंटरनेशनल स्टेडियम)
पाचवा टेस्ट: भारत vs इंग्लंड, 7-11 मार्च, धर्मशाला (हिमांचल प्रदेश क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम)


आणखी वाचा :


केएल राहुल ऐवजी केएस भरत की ध्रुव जुरेल, विकेटकिपर कोण, प्लेईंग 11 मध्ये कुणाला संधी मिळणार?


मोठी बातमी! विराट कोहलीच्या रिप्लेसमेंटची घोषणा, आरसीबीच्या खेळाडूला मिळाली संधी!