England vs India: कसोटी सामन्यात पराभवाचा सामना करावा लागणारा भारतीय संघ टी 20 मालिकेसाठी सज्ज झाला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये गुरुवारपासून तीन सामन्याची टी 20 मालिका सुरु होत आहे. गुरुवारी तीन सामन्याच्या मालिकेतील पहिला सामना होणार आहे. हा सामना द रोज बाउल, साउथेम्प्टन येथे रात्री साडेदहा वाजता सुरु होणार आहे. पहिल्या टी 20 सामन्यात अनेक सिनिअर खेळाडूंना आराम देण्यात आला आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या टी 20 मध्ये हे खेळाडू खेळणार आहेत. अशात पहिल्या सामन्यात युवा खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे.


पहिल्या टी 20 मालिकेसाठी कुणाला आराम?
पहिल्या टी 20 सामनायासाठी काही खेळाडूंना आराम देण्यात आला आहे. हे खेळाडू दुसऱ्या टी 20 सामन्यासाठी भारतीय संघात असतील. विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा, श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांना पहिल्या टी20 सामन्यासाठी आराम देण्यात आला आहे.  ऋतुराज गायकवाड़, संजू सॅमसन, राहुल त्रिपाठी, वेंटकेश अय्यर आणि अर्शदीप यांना पहिल्या टी20 साठी संघात स्थान मिळालेय.  


रोहित परतला, ऋतुराजला बाहेरचा रस्ता? -  
रोहित शर्मा भारतीय संघात परतला आहे. त्यामुळे रोहित शर्मा (ROHIT SHARMA) आणि ईशान किशन (Ishan Kishan) डावाची सुरुवात करु शकतात. अशात ऋतुराज गायकवाडला (Rituraj Gaikwad) बाहेर बसवण्यात येऊ शकते. तर मध्यक्रममध्ये संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या यांना संघात स्थान मिळू शकते. तर लोअर ऑर्डरमध्ये दीपक हुड्डा आणि दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) यांना प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळू शकते. गोलंदाजीमध्ये भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar), हर्षल पटेल, युजवेंद्र चहल आणि रवी बिश्नोई यांच्यावर गोलंदाजीची कमान असेल. हार्दिक पांड्या आणि दीपक हुड्डा दोघेही गोलंदाजी करु शकतात. हार्दिक पांड्या गोलंदाजीतही योगदान देऊ शकतो. 


पहिल्या टी 20 सामन्यासाठी दोन्ही संघाची संभावित प्लेइंग 11-
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दीपक हुड्डा, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई/आवेश खान.
इंग्लंड: जोस बटलर (कर्णधार), जेसन रॉय, डेविड मलान, लियाम लिविंगस्टोन, मोईन अली, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, डेविड विली, रीस टॉपली, टायमल मिल्स, मॅथ्यू पार्किंसन.


प्रतिस्पर्धी संघ कसे आहेत?
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), राहुल त्रिपाठी, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल, दीपक हुड्डा, हार्दिक पांड्या, वेंकटेश अय्यर, दिनेश कार्तिक, ईशान किशन, संजू सॅमसन, अर्शदीप सिंह, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, रवी बिश्नोई, उमरान मलिक, युजवेंद्र चहल.


इंग्लंड: जोस बटलर (कर्णधार), डेविड मलान, हॅरी ब्रूक, जेसन रॉय, लियाम लिविंगस्टोन, मोईन अली, सॅम करन, फील सॉल्ट, ख्रिस जॉर्डन, डेविड विली, मॅट पार्किंसन, रीस टोप्ले, रिचर्ड ग्लीसन, टायमल मिल्स.