IND vs BAN, World cup : भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यामध्ये आज विश्वछषकात सामना होणार आहे. पुण्याच्या एमसीए मैदानात हे दोन संघ आमने सामने असतील. रोहित शर्माच्या नेतृत्वाती टीम इंडिया आपला विजयरथ कायम ठेवण्यासाठी मैदानात उतरले. बांगलादेशचा संघ भारतापुढे कठीण आव्हान ठेवणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये आतापर्यंत अनेकदा वातावरण गरम झाले आहे. चाहत्यांसह खेळाडूंमध्येही गरमागरमी झालेली आहे. मैदानात आणि मैदानाबाहेर हे दोन्ही संघ चर्चेत असतात. बांगलादेशच्या चाहत्यांनी अनेकदा पातळी ओलांडली आहे. धोनीचे धडावेगळे शिर केलेला पोस्टर अथवा खेळाडूंचे अर्धे टक्कल केलेला पोस्टर असो.. असे अनेक वाद झाले आहेत. पाहूयात, याच पाच वादांबद्दल... 


रोहित फलंदाजी करताना दिलेला नो बॉल
2015 च्या विश्वचषकात भारताने बांगलादेशचा 109 धावांनी पराभव केला. या सामन्यात रोहित शर्माने वादळी फलंदाजी केली. पण एक वादही उद्भवला होता. रोहित शर्मा 90 धावांवर फलंदाजी करत होता, तेव्हा  रूबेल हुसैन याचा चेंडू कंबरेच्या जवळ फुलटॉस आला होता. रोहित शर्माने हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू लेग साइडचा फिल्डरच्या हातात केला. पंचांनी हा चेंडू नो बॉल दिला. त्यानंतर मैदानात गरमागरमी झाली होती. त्या चेंडूनंतर रोहित शर्माने आणखी 147 धावा जोडल्या होत्या. भारतीय संघाने या सामन्यात 300 पेक्षा जास्त धावांचा डोंगर उभारला होता. रोहित शर्माला दिलेल्या नो बॉलवरुन चांगलाच गदारोळ झाला होता. 


धोनीचं शिर धडावेगळ, पोस्टर व्हायरल


2016 चा आशिया चषक बांगलादेशमध्ये झाला होता. त्यावेळी भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये फायनलचा थरार होणार होता. या सामन्यापूर्वी बांगलादेशच्या चाहत्यांनी केले पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामध्ये बांगलादेशचा वेगवान गोलंदाज  तस्कीन अहमद याच्या हातात धोनीचे धडावेगळं झालेले शिर होते. या पोस्टरनंतर मोठा गदारोळ झाला होता. भारतीय चाहते भडकले होते. भारताने अंतिम सामन्यात बांगलादेशचा सहज पराभव केला होता.  


भारतीय खेळाडूंचे अर्धे केस कट - 


आशिया चषक  2016 च्याआधी 2015 मध्येही एक फोटो व्हायरल झाला होता. त्यामध्ये भारतीय खेळाडूंची अर्धी केस कट केलेला फोटो व्हायरल झाला होता. भारतीय संघ 2015 मध्ये बांगलादेश दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी हा पोस्टर व्हायरल झाला होता. या पोस्टरनंतर सोशल मीडियावर वातावरण तापलं होतं. 


मुस्तफिजुर रहमान याने पदार्पणात दोन सामन्यात 11 विकेट घेतल्या होत्या. या दौऱ्यावर बांगलादेशच्या एका वर्तमानपत्रातही भारताच्या खेळाडूंची अर्धी केस कट झाल्याचा फोटो छापण्यात आला होता. मुस्तफिजुर रहमान याच्या हातात वस्तरा दिसला होता. या फोटोनंतर सोशल मीडियात मोठा वाद झाला होता.  


ज्युनिअर खेळाडूंमध्येही वाद -


 2020 मध्ये अंडर 19 वर्ल्डकपमध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये सामना झाला होता. या सामन्यात बांगलादेशने विजय मिळवला होता. विजयानंतर बांगलादेशच्या युवा खेळाडूंचे संतुलन बिघडले होते. बांगलादेशच्या खेळाडूंनी भारताच्या खेळाडूंना शिव्या दिल्या होत्या. त्यानंतर स्टम्प आणि बॅट घेऊन दोन्ही संघाचे खेळाडू आमने सामने आले होते. 


कोहली-रूबेल यांच्यामध्ये वाद 


 2008 च्या अंडर 19 विश्वचषकात विराट कोहलीने भारताला चषक जिंकून दिला होता. त्यावेळी बांगलादेशचा रूबेल हुसैनही बांगलादेश संघाचा सदस्य होता. दोघांमध्ये त्यावेळी सामन्यादरम्यान वाद झाला होता. हा वाद इथेच थांबला नाही...  2011 मध्ये दोन्ही खेळाडूंनी वनडे विश्वचषकात पदार्पण केले होते. मीरपूरमध्ये झालेल्या सामन्यात  रुबेलने कोहलीला चेंडू मारण्याचा इसारा केला होता. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर 2015 मध्येही दोन्ही खेळाडू भिडले होते.  रूबेलने कोहलीला तीन धावांवर बाद केले होते, त्यानंतर सेलिब्रेशन चर्चेत राहिले होते.