World Cup 2023 , IND vs BAN : विश्वचषकात आज भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये लढत होत आहे. आजचा सामना जिंकून भारताला गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावण्याची संधी असेल. पुण्याच्या एमसीए मैदानात भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये लढत होणार आहे. पुण्यात कर्णधार रोहित शर्माच्या निशाण्यावर अनेक विक्रम आहेत. त्यापैकी एमएस धोनी, कपिल देव आणि एबी यांचे विक्रम रोहित शर्मा मोडण्याची शक्यता आहे.
हिटमॅनच्या नावावर जमा होणार मोठा रेकॉर्ड -
सलग तीन सामने जिंकणारी टीम इंडियाचा आत्मविश्वास वाढलेला आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल आणि श्रेयस अय्यर फॉर्मात आहे. 19 ऑक्टोबर रोजी पुण्याच्या मैदानात भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये लढत होणार आहे. या लढतीत रोहित शर्मा विश्वचषकातील षटकारांचा विक्रम नावावर करणार आहे. विश्वचषकात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजात रोहित शर्मा सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. रोहित शर्माच्या पुढे युनिवर्स बॉस ख्रिस गेल आणि मिस्टर 360 एबी डिव्हिलिअर्स आहेत. एबी डिव्हिलिअर्सचा विक्रम सध्या रोहित शर्माच्या निशाण्यावर आहे.
डिव्हिलिअर्सचा विक्रम मोडणार रोहित -
एबी डिव्हिलिअर्स याचा विक्रम मोडण्यासाठी रोहित शर्माला चार षटकारांची गरज आहे. विश्वचषकात डिव्हिलिअर्सने आतापर्यंत 37 षटकार ठोकले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या रोहित शर्माने विश्वचषकात आतापर्यंत 34 षटकार मारले आहेत. पुण्यात होणाऱ्या सामन्यात चार षटकार मारताच रोहित एबीला मागे टाकणार आहे. पुण्याच्या मैदानात चार षटकार मारताच विश्वचषकात सर्वाधिक षटकार मारणारा रोहित शर्मा दुसरा फलंदाज होणार आहे. युनिवर्स बॉस ख्रिस गेल सध्या पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. ख्रिस गेलच्या नावावर 49 षटकारांची नोंद आहे. यंदाच्या विश्वचषकात रोहित शर्मा हा विक्रम मोडण्याची शक्यता आहे. रोहित शर्माचा हा तिसरा विश्वचषक आहे, सर्वाधिक शतकांचा विक्रम रोहित शर्माने मोडीत काढला आहे. आता षटकारांचा विक्रम रोहितच्या निशाण्यावर आहे.
वनडे वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज -
1. ख्रिस गेल (वेस्ट इंडीज) - 49 छक्के
2. एबी डिव्हिलियर्स (दक्षिण अफ्रीका) - 37 छक्के
3. रोहित शर्मा (भारत) - 34 छक्के
4. रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया) - 31 छक्के
5. ब्रेंडन मॅक्युलम (न्यूझीलंड) - 29 छक्के
धोनीच्या विक्रमापासून फक्त 25 धावा दूर
पुण्यामध्ये रोहित शर्मा 25 धावांची खेळी करताच धोनीचा विक्रम मोडणार आहे. कर्णधार असताना धोनीने 2011 च्या विश्वचषकात 241 धावा केल्या आहेत. तर 2015 मध्ये धोनीच्या बॅटमधून 237 धावा चोपल्या आहेत. आता गुरुवारी रोहित शर्माने 25 धावा केल्यास धोनीचा विक्रम मोडला जाणार आहे.
कपिल देवचा विक्रम मोडण्यासाठी किती धावा ?
कपिल देव यांनी 1983 च्या विश्वचषकात 303 धावा केल्या होत्या. कपिल देव यांच्या नेतृत्वात भारताने हा विश्वचषक जिंकला होता. कपिल यांनी या विश्वचषकात 303 धावा केल्या होत्या. रोहित शर्माला कपिल देव यांचा विक्रम मोडण्यासाठी 87 धावांची गरज आहे.
कपिल देव आणि रोहित शर्मा यांचा विक्रम मोडण्यासाठी रोहित शर्माकडे साखळी फेरतील अद्याप सहा सामने शिल्लक आहेत. रोहित शर्मा आरामात हा विक्रम मोडण्याची शक्यता आहे.
रोहितची नजर पहिल्या स्थानावर ?
वनडे वर्ल्ड कपच्या एका हंगामात कर्णधार असताना सर्वाधिक धावांचा विक्रम सौरव गांगुलीच्या नावावर आहे. 2003 च्या विश्वचषकात सौरव गांगुलीने तीन शतकांच्या मदतीने 465 धावा चोपल्या होत्या. 2003 च्या विश्वचषकात भारतीय संघाला फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. 2019 च्या विश्वचषकात विराट कोहलीने पाच अर्धशतकाच्या मदतीने 443 धावा केल्या होत्या. सौरव गांगुली आणि विराट कोहली यांचा अपवाद वगळता इतर कोणत्याही कर्णधाराला आतापर्यंत विश्वचषकात 400 धावांचा टप्पा पार करता आला नाही. रोहित शर्मा सध्या तुफान फॉर्मात आहे. यंदाच्या विश्वचषकात रोहित शर्मा सौरव गांगुली आणि विराट कोहली यांचा विक्रम मोडण्याची शक्यता आहे.