India vs Bangladesh: चेन्नईतील चिदंबरम स्टेडियमची खेळपट्टी प्रामुख्याने फिरकीस पोषक मानली जाते. परंतु या खेळपट्टीवर शुक्रवारी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा जलवा पाहण्यास मिळाला. त्याने 50 धावांत 4 विकेट्स घेत बांगलादेशची दाणादाण उडवली. या जोरावर भारताने पहिल्या कसोटीत बांगलादेशचा (Ind vs Ban) पहिला डाव 149 धावांत गुंडाळला आणि यानंतर दुसऱ्या दिवसअखेर तब्बल 308 धावांची भक्कम आघाडी मिळवली. मात्र भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात शाकिब अल हसनची (Shakib Al Hasan) एक कृती चर्चेचा कारण बनली.


शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) फलंदाजी करताना काळा धागा चघळताना दिसला. साधारणपणे कोणताही फलंदाज फलंदाजी करताना असे काही करत नाही. मात्र, शाकिब अल हसनचे हे विचित्र कृत्य कॅमेऱ्यांपासून लपून राहू शकले नाही आणि हे पाहताच आता सोशल मीडियावर त्याची चर्चा होत आहे. पण या युक्तीचा शाकिब अल हसनच्या फलंदाजीशी काय संबंध? या प्रश्नाचे उत्तर बांगलादेशचा माजी सलामीवीर तमिम इक्बालने दिले. 


नेमकं प्रकरण काय?


शाकिब अल हसन बॅटिंगवेळी आपल्या गळ्यातील काळा धागा चघळताना दिसला. शाकिबचे हे कृत्य सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. यामागचे लॉजिक काय, असा प्रश्न अनेक चाहत्यांना पडला आहे. समालोचन करणाऱ्या दिनेश कार्तिकने याचे उत्तर दिले आहे. तो म्हणाला की, त्याची जी ही सवय आहे ती त्याला फलंदाजीच्या वेळी फायदेशीर ठरते, एकाग्रता वाढवण्यासाठी त्याला याची मदत होते. एवढेच नाही, तर त्यामुळे डोके लेग साइडला झुकत नाही. याचा अर्थ फलंदाजी करताना स्वतःवर नियंत्रण ठेवण्यासाठी शाकिब हे मॅजिक वापरतो. जे लॉजिकली त्याला गेम उंचावण्यास मदत करते, असे त्याला वाटते.






बांगलादेशमध्ये शाकिबविरोधात गुन्हा दाखल-


बांगलादेशची राजधानी ढाका येथील अदाबोर पोलीस ठाण्यात रफिकुल इस्लाम नावाच्या व्यक्तीने शाकिब अल हसनविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बांगलादेशात सुरू असलेल्या निदर्शनेदरम्यान रफिकुलचा मुलगा रुबेल याचा 7 ऑगस्ट रोजी मृत्यू झाला होता. ढाक्यातील रिंग रोडवर झालेल्या आंदोलनादरम्यान रुबेलच्या छातीत आणि पोटात गोळ्या लागल्याचे एका मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे. रफीकुल इस्लामने नमूद केलेल्या आरोपींच्या यादीत एकूण 154 जणांचा समावेश आहे. आरोपींच्या यादीत शाकिबचे नाव 28 व्या क्रमांकावर असून त्याच्याशिवाय बांगलादेशी अभिनेता फिरदौस अहमद याच्यावरही हत्येचा आरोप आहे.


संबंधित बातमी:


Ind vs Ban: पहिले जसप्रीत बुमराह, मग आकाश दीप; बांगलादेशच्या 3 फलंदाजांची दांडी गुल, स्टम्प उडाले, Video