IND vs BAN, 2nd Test: भारत विरुद्ध बांग्लादेश (India vs Bangladesh) यांच्यात दुसरा कसोटी सामना (IND vs BAN 2nd Test) ढाका येथील शेर ए बांगला स्टेडियमवर सुरु असून सामन्याचा पहिला दिवस संपला आहे. दिवसाखेर भारत 208 धावांनी पिछाडीवर आहे. सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशचा संघ 227 धावा करु शकला. ज्यानंतर भारताने फलंदाजी सुरु केली असून 19 धावांवर 0 बाद अशा स्थितीत भारत आहे. सलामीवीर केएल राहुल आणि शुभमन गिल फलंदाजी करत आहेत. 






पहिल्या कसोटीत भारताने प्रथम फलंदाजी करत एक तगडी धावसंख्या उभारुन बांगलादेशवर दबदबा निर्माण केला होता, आज बांगलादेशने प्रथम फलंदाजी निवडत असच करण्याचा डाव आखला होता. पण भारतीय गोलंदाजांनी कमाल गोलंदाजी करत बांगलादेशच्या फलंदाजांना 227 धावांत सर्वबाद केलं. बांगलादेशचा संघ 73.5 षटकंच खेळू शकला. यावेळी बांगलादेशसाछी मोमीनल हक याने 84 धावांची एकहाती झुंज दिल्यामुळे बांगलादेश 200 पार धावसंख्या पोहचवू शकला. भारतीय गोलंदाजांनी आज सामन्यात सुरुवातीपासून कमाल कामगिरी केली. भारताच्या वेगवान गोलंदाजांनी सर्वाधिक विकेट्स घेतल्या. यामध्ये उमेश यादवने 4 तर जयदेव उनाडकटने 2 विकेट्स घेतल्या. तर रवीचंद्रन अश्विन यानेही 4 विकेट्स घेतल्या. दुसरीकडे बांगलादेशच्या संघाला सुरुवातीपासून धावा करण्यात अडचण येत होती. मोमीनलने 84 धावा केल्या असल्या तरी काही खेळाडूंनी त्याला साथ दिल्याने 200 पार धावसंख्या जाऊ शकली. यामध्ये मुशफिकूर रहिने 26 तर लिटन दासनं 25 धावांची साथ मोमीनलला दिली.


मैदानात उतरताच जयदेवचा अनोखा विक्रम


भारताचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटला आज जवळपास 12 वर्षानंतर कसोटी संघात संधी मिळाली आहे. 2010 मध्ये कसोटी पदार्पण केल्यानंतर, उनाडकट आता त्याची दुसरी कसोटी थेट 12 वर्षानंतर खेळत आहे. यादरम्यान त्याने 118 कसोटी सामने गमावले आहेत. यापूर्वी कार्तिकने 2010 ते 2018 दरम्यान 87 कसोटी सामने गमावले होते. सर्वाधिक कसोटी गमावण्याचा विक्रम इंग्लंडच्या गॅरेथ बिट्टीच्या नावावर आहे, ज्यांनी 2005 ते 2016 दरम्यान 142 कसोटी सामने गमावले होते. उनाडकट हा दुसरा सर्वाधिक कसोटी सामना न गमावणारा खेळाडू ठरला असून भारतीय खेळाडूंमध्ये अव्वल आहे.


हे देखील वाचा-