IND vs BAN, Team India : भारतीय वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटला (Jaydev Unadkat) तब्बल 12 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर पुन्हा कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली आहे. उनाडकटने बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात (India vs Bangladesh 2nd Test) टीम इंडियामध्ये जागा मिळवली आहे. विशेष म्हणजे मैदानात उतरताच एक अनोखा विक्रमही आपल्या नावावर जयदेवने केला आहे. पहिली कसोटी खेळल्यानंतर दुसरी कसोटी खेळण्यासाठी सर्वाधिक काळ प्रतीक्षा करणारा भारतीय खेळाडू जयदेव ठरला आहे. उनाडकटने 2018 मध्ये अशीच कामगिरी करणाऱ्या दिनेश कार्तिकला मागे टाकलं आहे.
2010 मध्ये कसोटी पदार्पण केल्यानंतर, उनाडकट आता त्याची दुसरी कसोटी थेट 12 वर्षानंतर खेळत आहे. यादरम्यान त्याने 118 कसोटी सामने गमावले आहेत. यापूर्वी कार्तिकने 2010 ते 2018 दरम्यान 87 कसोटी सामने गमावले होते. सर्वाधिक कसोटी गमावण्याचा विक्रम इंग्लंडच्या गॅरेथ बिट्टीच्या नावावर आहे, ज्यांनी 2005 ते 2016 दरम्यान 142 कसोटी सामने गमावले होते. उनाडकट हा दुसरा सर्वाधिक कसोटी सामना न गमावणारा खेळाडू ठरला असून भारतीय खेळाडूंमध्ये अव्वल आहे.
विकेट्सचं खातंही खोललं
उनाडकटचं कसोटी क्रिकेटमधलं पुनरागमन चांगलं झाल्याचं दिसून आलं आहे. त्याने भारताला पहिलं यश मिळवून दिलं असून उनाडकटने त्याच्या पाचव्या षटकात झाकीर हसनची (Zakir Hasan) विकेट घेतली. मागील सामन्यात शतक झळकावणाऱ्या झाकीरला उनाडकटने स्वस्तात तंबूत धाडल्यानं त्याचं कौतुक होत आहे. केएल राहुलने यावेळी एक उत्तम झेल टिपल्याचं दिसून आलं. उनाडकटच्या कारकिर्दीतील ही पहिली कसोटी विकेट आहे. उनाडकटला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळत नसली तरी देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो सतत दमदार कामगिरी करत होता. उनाडकटने रणजी ट्रॉफीमध्येही (Ranji Trophy) शानदार गोलंदाजी करत सौराष्ट्राला चॅम्पियन बनवले आहे.
हे देखील वाचा-