IND vs BAN, 2nd Test: भारताच्या बांगलादेश दौऱ्यातील भारत आणि बांग्लादेश (India vs Bangladesh) यांच्यातील दुसरा कसोटी सामना ढाका येथील शेर ए बांगला स्टेडियमवर सुरु आहे. सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करत पहिल्या डावात 227 धावा स्कोरबोर्डवर लावल्या आहेत. यावेळी बांगलादेशकडून मोमीनल हक याने एकहाती 84 धावांची झुंज दिल्यामुळे बांगलादेशचा संघ 200 पार जाऊ शकला. भारतीय गोलंदाजांनीन मात्र दमदार गोलंदाजी आज केली. उमेश यादव आणि आर अश्विनने प्रत्येकी 4 तर उनाडकटने 1 विकेट घेतली.
सामन्यात सर्वप्रथम बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला. पहिल्या कसोटीत भारताने प्रथम फलंदाजी करत सुरुवातीपासून सामन्यावर वर्चस्व स्थापन केलं होतं. बांगलादेशचाही हाच डाव होता. पण भारतीय गोलंदाजांनी आज कमाल गोलंदाजी करत बांगलादेशच्या फलंदाजांना अधिक काळ बॅटिंग करुन दिली नाही. 73.5 षटकांत 227 धावाच बांगलादेशचा संघ करु शकला. यावेळी मोमीनल हक याने 84 धावांची एकहाती झुंज दिल्यामुळे बांगलादेश इतकी धावसंख्या करु शकला. भारतीय गोलंदाजीचा विचार करता भारताच्या वेगवान गोलंदाजांनी सर्वाधिक विकेट्स घेतल्या. यामध्ये उमेश यादवने 4 तर जयदेव उनाडकटने 2 विकेट्स घेतल्या. तर रवीचंद्रन अश्विन यानेही 4 विकेट्स घेतल्या.
दुसऱ्या कसोटीसाठी कसे आहेत दोन्ही संघ?
टीम इंडिया- केएल राहुल (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकिपर), श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, जयदेव उनाडकट, उमेश यादव, मोहम्मद सिराज
टीम बांगलादेश - नजमुल हुसेन शांतो, झाकीर हसन, मोमिनुल हक, लिटन दास, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन (कर्णधार), नुरुल हसन (विकेटकिपर), मेहदी हसन मिराझ, तैजुल इस्लाम, खालेद अहमद, तस्किन अहमद
हे देखील वाचा-