India vs Bangladesh 2nd t20i : दिल्ली टी-20 मध्ये बांगलादेशच्या गोलंदाजांनी पॉवरप्लेमध्ये चमकदार कामगिरी करत टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरला हादरा दिला. पहिल्या 6 षटकांमध्ये टीम इंडियाने संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि सूर्यकुमार यादवसारखे दिग्गज फलंदाज गमावले, पण यानंतर बांगलादेशी संघाने कधीच विचार केला नसेल अशा गोष्टीचा त्यांना सामना करावा लागला. राजधानीत नितीश कुमार रेड्डी आणि रिंकू सिंग नावाचे वादळ आले.  






भारत आणि बांगलादेश यांच्यातील 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जात आहे. बांगलादेशच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाने 221 धावा केल्या आहेत.


सुरुवातीच्या धक्क्यानंतर नितीश आणि रिंकूने आक्रमक फलंदाजी केली आणि चौथ्या विकेटसाठी 108 धावांची भागीदारी झाली. यादरम्यान नितीशने आपला दुसरा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळताना कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. अर्धशतक ठोकल्यानंतरही नितीशने आपली आक्रमक फलंदाजी थांबवली नाही आणि तुफानी फलंदाजी सुरूच ठेवली. नितीश मात्र 34 चेंडूंत चार चौकार आणि सात षटकारांच्या मदतीने 74 धावा करून बाद झाला. नितीश बाद झाल्यानंतर रिंकू सिंगनेही अर्धशतक झळकावले, मात्र तो 29 चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ५३ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.


हार्दिक पांड्याने काही मोठे फटके खेळले आणि भारताची धावसंख्या 200 धावांच्या पुढे नेली, पण भारतीय संघाने शेवटच्या षटकात तीन विकेट गमावल्या. हार्दिक 19 चेंडूंत 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 32 धावा करून बाद झाला. बांगलादेशकडून रिशाद हुसेनने तीन तर तस्किन अहमद, तन्झिम हसन शाकिब आणि मुस्तफिजुर रहमानने प्रत्येकी दोन गडी बाद केले.



हे ही वाचा -


Nitish Kumar Reddy Ind vs Ban : 6,6,6,6,6,6... राजधानीत नितीश रेड्डीचा धमाका! दुसऱ्याच सामन्यात 11 चेंडूत ठोकल्या 58 धावा

इशान किशनचा उतरला माज! टीम इंडियात येण्यासाठी असेल आता शेवटची संधी; 'या' संघाचे करणार नेतृत्व 


Ind vs Ban 2nd T20 : बांगलादेशने भारताविरुद्ध जिंकली नाणेफेक; कर्णधार सूर्याने संघात केला नाही बदल, जाणून घ्या प्लेइंग-11