India vs Bangladesh 2nd t20i Nitish Kumar Reddy : भारतीय क्रिकेट संघ आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा टी-20 सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जात आहे. बांगलादेशचा कर्णधार नझमुल हुसेन शांतोने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाची सुरुवात खुपच खराब झाली. सुरुवातीची जोडी आणि कर्णधार सूर्यकुमार यादवने स्वस्तात आऊट झाले. 41 धावांवर भारताने 3 विकेट गमावल्या होत्या.
यानंतर नितीश रेड्डी यांनी रिंकी सिंगसोबत डावाची धुरा सांभाळली. नितीश रेड्डीने आपला दुसरा टी-20 आंतरराष्ट्रीय खेळताना 27 चेंडूत अर्धशतक झळकावले. नितीशने बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या टी-20 सामन्यातून टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. ग्वाल्हेरमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या टी-20 मध्ये त्याने 15 चेंडूत नाबाद 16 धावा केल्या.
दुसऱ्या टी-20 मधील कामगिरीबद्दल बोलायचे तर, त्याने 224.24 च्या तुफानी स्ट्राईक रेटने 34 चेंडूत 74 धावा केल्या. या खेळीत त्याने 4 चौकार आणि 7 शानदार षटकार मारले. म्हणजेच फक्त चौकार आणि षटकारांच्या मदतीने त्याने 11 चेंडूत 58 धावा ठोकल्या. मुस्तफिझूर रहमानच्या संथ चेंडूवर मेहदी हसन मिराजने नितीशचा झेल घेतला. नितीश आणि रिंकू सिंग यांच्यात चौथ्या विकेटसाठी 108 धावांची भागीदारी झाली.
दोन्ही संघांचे प्लेइंग-11
भारताची प्लेइंग-11 : संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), नितीश रेड्डी, हार्दिक पांड्या, रायन पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, मयंक यादव.
बांगलादेशची प्लेइंग-11 : परवेझ हुसेन इमॉन, लिटन दास (विकेटकीपर), नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तौहीद हरदोय, महमुदुल्लाह, झाकीर अली, मेहदी हसन मिराज, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, तन्झिम हसन साकीब, मुस्तफिजुर रहमान.
हे ही वाचा -
इशान किशनचा उतरला माज! टीम इंडियात येण्यासाठी असेल आता शेवटची संधी; 'या' संघाचे करणार नेतृत्व
Mohammed Shami : पहिल्या 2 सामन्यांसाठी संघाची घोषणा; मुकेश कुमारला मिळाली संधी, मोहम्मद शमी बाहेर