India vs Bangladesh 1st Test: भारतीय संघाने बांगलादेशला (Ind vs Ban) 515 धावांचे आव्हान दिले आहे. भारताने पहिल्या डावात 376 धावा केल्या होत्या. या प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ पहिल्या डावात केवळ 149 धावाच करु शकला. त्यामुळे भारताला 227 धावांची आघाडी मिळाली होती. त्यानंतर भारताने 4 विकेट्स गमावत 287 धावांवर दुसरा डाव घोषित केला. दुसऱ्या डावात ऋषभ पंत आणि शुभमन गिल यांच्या शतकाच्या जोरावर भारताला 515 धावांपर्यंत मजल मारता आली. त्यामुळे आता बांगलादेशला सामना जिंकण्यासाठी 515 धावांचे लक्ष्य असणार आहे. 






भारताचा दुसरा डाव कसा राहिला?


दुसऱ्या डावात रोहित शर्मा 5 तर यशस्वी जैस्वाल 10 धावा करून बाद झाला. विराट कोहली देखील मोठी खेळी करु शकला नाही. विराट कोहलीने दुसऱ्या डावात 17 धावा केल्या. यानंतर शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांनी या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारली. या दोघांमध्ये शतकी भागीदारी झाली. गिलने 176 चेंडूंचा सामना करत नाबाद 119 धावा केल्या. त्याने 10 चौकार आणि 4 षटकार मारले. तने अप्रतिम कामगिरी केली. त्याने 128 चेंडूंचा सामना करत 109 धावा केल्या. पंतच्या खेळीत 13 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. केएल राहुलने नाबाद 22 धावा केल्या. त्याने 19 चेंडूंचा सामना करत 4 चौकार मारले.


ऋषभ पंत अन् शुभमन गिलने धू धू धुतले-


बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात 124 चेंडूत ऋषभ पंतने आपले शतक पूर्ण केले. तर 128 चेंडूत 109 धावा करत ऋषभ पंत (Rishabh Pant) बाद झाला. ऋषभ पंतने शतक झळकवल्यानंतर त्याच्यासह संपूर्ण मैदान भावूक झाल्याचं दिसून आले. मैदानात उपस्थित असणाऱ्या प्रेक्षकांपासून रोहित शर्मा, विराट कोहली आणि ड्रेसिंग रुममधील सर्व खेळाडूंनी उभे राहत ऋषभ पंतचे कौतुक केले. ऋषभ पंतने या खेळीत 13 चौकार आणि 4 षटकार टोलावले. ऋषभ पंत शतक झळकवून बाद झाल्यानंतर शुभमन गिलने देखील शतक केले. शुभमन गिल सध्या 162 चेंडूत 101 धावा केल्यानंतर खेळत आहे. शुभमन गिलने या खेळीत 9 चौकार आणि 3 षटकार लगावले.






संबंधित बातमी:


मैदानातील चाहत्यांपासून रोहित, कोहली, संपूर्ण ड्रेसिंग रुमपर्यंत...; ऋषभ पंतच्या शतकानंतर सर्व भावूक