IND vs AUS : नागपूरमध्ये सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात रविंद्र जाडेजानं आग ओकणारी गोलंदाजी केली आहे. दुखापतीनंतर मैदानावर परतणाऱ्या रविंद्र जाडेजाच्या गोलंदाजीचा सामना कांगारुंना करताना आला नाही. जाडेजाच्या गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाचे फलंदाजांनी नांग्या टाकल्या. जाडेजानं पाच फलंदाजांना बाद करत ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर ढकलले. रविंद्र जाडेजाच्या गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाला 200 धावाही करता आल्या नाहीत. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 177 धावांत गारद झाला.
रविंद्र जाडेजाच्या भेदक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी नांग्या टाकल्या. जाडेजानं 22 षटकात 47 धावांच्या मोबदल्यात पाच विकेट घेतल्या. त्यानं आठ षटकं निर्धाव टाकली. जाडेजानं मार्नस लबुशेन, स्टीव्ह स्मिथ, मॅट रेनशॉ, पीटर हँड्सकॉम्ब आणि टॉड मर्फी यांना बाद केलं. रविंद्र जाडेजाच्या फिरकीपुढे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी नांग्या टाकल्या. त्यामुळेच पहिल्या दिवसावर भारताने वर्चस्व गाजवलं. रविंद्र जाडेजानं स्मिथ आणि लाबुशेन यांची जमलेली जोडी फोडत भारताला मोठं यश मिळवून दिलं होतं. त्यानंतर जाडेजानं लागोपाठ विकेट घेत ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर ढकललं.
जाडेजाच्या जाळ्यात कसे अडकले कांगारु, पाहा व्हिडीओ
आशिया कपपासून टीम इंडियात नाही
रविंद्र जाडेजानं मोठ्या कालावधीनंतर भारतीय संघात पुनरागमन केलेय. त्यानं 2022 च्या आशिया कपमध्ये भारतीय संघासाठी शेवटचा सामना खेळला होता. स्पर्धेदरम्यान त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली, त्यानंतर त्याला पाच ते सहा महिने त्याला क्रिकेटपासून दूर राहावे लागले होते. यानंतर तो 2022 मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-20 विश्वचषकही खेळू शकला नाही. आता त्यानं बॉर्डर गावस्कर मालिकेतून दमदार पुनरागमन केलेय.
आणखी वाचा :