India vs Australia Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs Aus) यांच्यात बॉर्डर-गावस्कर मालिका 9 फेब्रुवारीपासून नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन क्रिकेट मैदानावर सुरू झाली आहे. पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने फलंदाजीचा निर्णय घेतला. ज्यानंतर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 177 धावांवर आटोपला आहे. दरम्यान या कसोटी मालिकेत विराट कोहलीशिवाय स्टीव्ह स्मिथच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष असणार आहे. अशात हे दोघेही बऱ्याच वर्षांपासून एकमेंकाचे प्रतिस्पर्धी असल्याने त्यांच्यात कायम चुरस दिसून येते.


नागपूर कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रादरम्यान विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ यांच्यातील संभाषणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  सामन्यात कांगारू संघाने आपले दोन्ही सलामीचे फलंदाज 2 धावांवर गमावले होते. ज्यानंतर लाबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ यांनी काही प्रमाणात डाव सांभाळत धावा काढणं सुरू ठेवलं. दरम्यान भारतीय फिरकी गोलंदाज गोलंदाजीवर आल्यानंतर दोन्ही फलंदाज संघर्ष करताना दिसले. जाडेजा आणि अक्षर यांनी दोन्ही फलंदाजांना चांगलच हैराण केलं, यादरम्यान स्लिपमध्ये उभा असलेला विराट कोहली हसताना दिसला. दरम्यान, डावाच्या 14व्या षटकात स्मिथ पुढे आला आणि अक्षर पटेलनं टाकलेला चेंडू त्याने खेळला, त्यानंतर षटक संपल्यावर कोहलीने स्मिथच्या गळ्यात हात घालून त्याला काहीतरी बोलला आणि त्यानंतर दोघेही हसायला लागले.


पाहा VIDEO -






जाडेजा-अश्विनची कमाल गोलंदाजी


ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाचा विचार करता सर्वात आधी नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. एक मोठी धावसंख्या पहिल्या डावात करण्याची ऑस्ट्रेलियाची रणनीती होती. पण भारताने अप्रतिम गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाचा हा मनसूबा हाणून पाडला. यावेळी सर्वोत्तम गोलंदाजी रवींद्र जाडेजाने केली. त्याने 22 ओव्हरमध्ये 47 रन देत एकूण पाच गडी बाद केले. दुसरीकडे अश्विनने तीन विकेट घेतल्या. तर सिराज आणि शमीनं प्रत्येकी एक विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाकडून यावेळी अॅलेक्स कॅरी याने 37 तर लाबुशेननं 49 धावांची सर्वाधिक खेळी केली. सामन्यात भारताकडून अगदी सुरुवातीपासूनच चांगली गोलंदाजी सुरु होती. दोन्ही सलामवीरांना शमी आणि सिराजनं बाद केलं. पण त्यानंतर भारताच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेलियाचे 8 गडी काही वेळातच बाद झाले. यावेळी सर्वात कमाल गोलंदाजी करणाऱ्या जाडेजाने 5 विकेट्स घेतल्या.


हे देखील वाचा-