India vs Australia, Nagpur Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs Aus) यांच्यात नागपुरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात (VCA Cricket Stadium) पहिला कसोटी सामना (India vs Australia 1st Test) सुरु असून पहिल्या दिवशीचा डाव आटोपला आहे. दरम्यान पहिल्या दिवशीच्या अखेरीस भारत 77 वर 1 बाद अशी असून भारत 100 धावांनी पिछाडीवर आहे. सामन्यात आधी फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाने 177 धावा केल्या. भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली यावेळी जाडेजानं 5 तर अश्विन 3 विकेट्स घेतल्या. त्यानंतर फलंदाजीला आल्यावर कॅप्टन रोहित आणि केएल राहुल यांनी अर्धशतकी भागिदारी केली. राहुल 20 धावा करुन बाद झाला. तर रोहित शर्मा नाबाद 56 आणि आर अश्विन नाबाद शून्य धावांवर क्रिजवर आहे.
सामन्यात सर्वात आधी नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. एक मोठी धावसंख्या पहिल्या डावात करण्याची ऑस्ट्रेलियाची रणनीती होती. पण भारताने अप्रतिम गोलंदाजी केली. सामन्यात भारताकडून अगदी सुरुवातीपासूनच चांगली गोलंदाजी सुरु होती. दोन्ही सलामवीरांना शमी आणि सिराजनं बाद केलं. पण त्यानंतर भारताच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेलियाचे 8 गडी काही वेळातच बाद झाले. यावेळी जाडेजाने सर्वोत्तम कामगिरी करत 22 ओव्हरमध्ये 47 रन देत एकूण पाच गडी बाद केले. दुसरीकडे अश्विनने तीन विकेट घेतल्या. तर सिराज आणि शमीनं प्रत्येकी एक विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाकडून यावेळी अॅलेक्स कॅरी याने 37 तर लाबुशेननं 49 धावांची सर्वाधिक खेळी केली.
रोहितनं करुन दिली दमदार सुरुवात
177 धावा ऑस्ट्रेलियाने केल्यावर फलंदाजीला आलेल्या भारताकडून कॅप्टन रोहित शर्माने सुरुवातीपासूनच तुफान फटकेबाजी सुरु केली. आल्याआल्या चौकार मारण्यास त्यानं सुरुवात केली. ज्यामुळे भारतानं दिवस संपताना 77 धावांपर्यंत मजल मारली. यावेळी राहुल सावध खेळी खेळत होता पण 20 धावांवर त्याला मर्फी यानं बाद केलं. दरम्यान रोहितनं 69 चेंडूत नाबाद 56 धावा केल्या असून त्याने 9 चौकार आणि 1 षटकार यावेळी ठोकला आहे. दुसरीकडे क्रिजवर आर अश्विन रोहितच्या मदतीला असून दुसऱ्या दिवशी हे दोघे भारतीय फलंदाजीची सुरुवात करतील.
हे देखील वाचा-