India vs Australia 4th Test Day 3 : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतील चौथा सामना मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळला जात आहे. तिसऱ्या दिवसाचा चहाचा ब्रेक वेळेपूर्वी जाहीर करण्यात आला आहे. खराब प्रकाश आणि पावसामुळे सामना थांबवावा लागला. ऑस्ट्रेलियाच्या 474 धावांसमोर भारताने 7 विकेट गमावून 326 धावा केल्या आहेत. नितीश रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर शानदार फलंदाजी करत आहेत. दोघांमध्ये 8व्या विकेटसाठी शतकी भागीदारी आहे. 


तिसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रात टीम इंडियाचा पलटवार






खराब प्रकाश आणि हलका पाऊस आल्यामुळे पंचांनी वेळेपूर्वी चहा घेण्याचा निर्णय घेतला. तिसऱ्या दिवशी चहापानापर्यंत भारताने पहिल्या डावात सात गडी गमावून 326 धावा केल्या होत्या. सध्या नितीश रेड्डी 85 धावांवर तर वॉशिंग्टन सुंदर 40 धावांवर नाबाद आहे. आतापर्यंत या दोघांमध्ये आठव्या विकेटसाठी 105 धावांची भागीदारी झाली आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 474 धावा केल्या होत्या. या बाबतीत भारत अजूनही 148 धावांनी मागे आहे. 






नितीशने आपल्या फलंदाजीत ताकद दाखवली असून सुंदरने त्याला चांगली साथ दिली आहे. दुसऱ्या सत्रात भारताने 24 षटकांत 82 धावा केल्या आणि एकही विकेट गमावली नाही. भारताला तिसऱ्या दिवशी दोन धक्के बसले. ऋषभ पंत 28 धावा करून बाद झाला तर रवींद्र जडेजा 17 धावा करून बाद झाला.


नितीश रेड्डीचे पहिले कसोटी अर्धशतक


ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आपल्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या नितीश रेड्डी यांनी आतापर्यंत खूप प्रभावित केले आहे. मेलबर्नमध्ये, जेव्हा भारतीय संघाने ऋषभ पंत आणि रवींद्र यांसारख्या सेटच्या फलंदाजांच्या विकेट गमावल्या, तेव्हा नितीशने जबाबदारी स्वीकारली आणि शानदार फलंदाजी करत कारकिर्दीतील पहिले कसोटी अर्धशतक 81 चेंडूत पूर्ण केले. यादरम्यान त्याने चार चौकार आणि एक षटकारही लगावला. नितीशने भारताच्या डावाच्या 83व्या षटकात मिचेल स्टार्कविरुद्ध चौकार मारून आपले अर्धशतक पूर्ण केले. यानंतर पुष्पा स्टाईल सेलिब्रेशन केले.


हे ही वाचा -


Nitish Kumar Reddy : नितीश कुमार रेड्डी... फ्लावर नहीं फायर है! खांद्याला दुखापत तरी ठोकले पहिले अर्धशतक, पुष्पा स्टाईल सेलिब्रेशन, Video