IND vs AUS Pink Ball Test Weather Report Adelaide : टीम इंडियाने पाच सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2024-25 ची शानदार सुरुवात केली. पर्थमध्ये खेळलेला पहिला सामना 295 धावांनी जिंकला. आता उभय संघांमधील मालिकेतील दुसरा कसोटी सामना 6 डिसेंबरपासून ॲडलेड ओव्हलवर खेळला जाईल, जो पिंक बॉलने खेळला जाईल. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ पुनरागमन करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेल, ज्याला सामोरे जाणे टीम इंडियासाठी सोपे होणार नाही. एकीकडे गवताच्या खेळपट्टीने ॲडलेड कसोटीत भारतीय संघाचा ताण वाढवला आहे, तर दुसरीकडे पहिल्या दिवशीचे हवामानही डोकेदुखी ठरू शकते.
ॲडलेडमधील हवामानाबद्दल बोलायचे झाल्यास, सामना 6 डिसेंबर रोजी स्थानिक वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता सुरू होईल. जर आपण पहिल्या दिवसाच्या हवामानाबद्दल बोललो तर पावसात व्यत्यय येऊ शकतो. वेदर डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार मॅच सुरू होण्यापूर्वी 20 ते 30 टक्के पावसाची शक्यता आहे. सामना सुरू झाल्यानंतर पावसाची शक्यता कमी होईल. पण ढगांचा जमाव दिसून येईल, अशा स्थितीत वेगवान गोलंदाजांना त्याचा पुरेपूर फायदा होईल.
हवामानाचा विचार करता नाणेफेक जिंकणाऱ्या संघासाठी प्रथम फलंदाजी करायची की गोलंदाजी करायची हे ठरवणे कठीन जाईल. या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी पावसाची फारच कमी शक्यता आहे, तर पाचव्या दिवशी काही पाऊस पडण्याची शक्यता आहे.
ॲडलेड ओव्हलवरील भारतीय संघाच्या विक्रमावर नजर टाकली तर, त्यांनी ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध एकूण 13 कसोटी सामने खेळले आहेत, त्यापैकी केवळ 2 सामने त्यांनी जिंकले आहेत, तर 8 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. 3 सामने अनिर्णित राहिले. रोहित शर्मा पुन्हा एकदा ॲडलेड कसोटीत टीम इंडियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे, याशिवाय शुभमन गिलही प्लेइंग 11 मध्ये पुनरागमन करणार आहे.
हे ही वाचा -
Abhishek Sharma : 11 षटकार आणि 28 चेंडूत शतक... युवराजच्या 'शिष्याने' टी-20 मध्ये केला भीम पराक्रम