IND vs AUS, 2nd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील दुसरा कसोटी सामना 17 फेब्रुवारीपासून म्हणजेच आजपासून खेळवला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होत आहे. मालिकेत पुनरागमन करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकणं आवश्यक आहे. सध्याच्या स्थितीत कसोटी मालिकेत भारत 1-0 ने पुढे आहे. नागपुरात खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने कांगारूं संघाचा एक डाव आणि 132 धावांनी पराभव केला. टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जाडेजासाठी हा सामना खास आहे. या सामन्यात तो एक खास रेकॉर्ड करू शकतो.


India vs Australia 2nd Test Day 1: विक्रम रचण्यापासून एक विकेट दूर


ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दिल्ली कसोटीत रवींद्र जडेजाला विशेष क्लबमध्ये सामील होण्याची संधी आहे. त्याने आणखी एक विकेट घेतल्यास तो भारताकडून 250 किंवा त्याहून अधिक कसोटी बळी घेणाऱ्या अनुभवी गोलंदाजांच्या यादीत सामील होईल. जाडेजाने आतापर्यंत कसोटीत 249 बळी घेतले आहेत. जर त्याने एक विकेट घेतली तर जाडेजा कसोटीत 250 विकेट्स पूर्ण करणारा भारताचा आठवा गोलंदाज ठरेल.


India vs Australia 2nd Test Day 1: सर्वाधि विकेट्स घेणारे खेळाडू


 भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर आहे. कुंबळे आपल्या कसोटी कारकिर्दीत 619 विकेट घेण्यात यशस्वी ठरला होता. त्याच्याशिवाय आर अश्विन 457, कपिल देव 434, हरभजन सिंग 417, इशांत शर्मा 311, झहीर खान 311, बिशन सिंग बेदी 266 आणि रवींद्र जाडेजाने 249 विकेट घेतल्या आहेत.


India vs Australia 2nd Test Day 1: जाडेजाची कसोटी कारकिर्द थोडक्यात


रवींद्र जाडेजाने 2012 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागपुरात कसोटी पदार्पण केलं होते. गेल्या 10 वर्षांपासून तो टीम इंडियाचा भाग आहे. जाडेजाने आतापर्यंत 61 कसोटी सामने खेळले आहेत. या 61 सामन्यांमध्ये त्याने अष्टपैलू कामगिरी करताना 2 हजार 593 धावा करण्यासोबतच 249 विकेट्स घेतल्या आहेत. कसोटीत त्याच्या नावावर 3 शतकं आणि 18 अर्धशतकं आहेत. क्रिकेटच्या सर्वात मोठ्या फॉरमॅटमध्ये नाबाद 175 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. दुसरीकडे, गोलंदाजीचा विचार केला तर त्याची सर्वोत्तम कामगिरी म्हणजे 48 धावांत 7 बळी मिळवणे ही आहे.


India vs Australia 2nd Test Day 1: ऑस्ट्रेलियानं निवडली फलंदाजी


भारतीय क्रिकेट संघ (Team India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) संघ यांच्यात चार कसोटी सामन्यांनी बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिका खेळवली जात आहे. आजपासून दुसरा सामना दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात असून ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत फलंदाजी निवडली आहे. त्यामुळे भारत क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला आहे. मालिकेतील पहिला सामना भारताने एक डाव आणि 132 धावांनी जिंकत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. आता दुसरा सामना सुरु आहे. दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये एन्ट्रीसाठी ही मालिका जिंकणं दोन्ही संघासाठी फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे ही मालिकाही महत्त्वाची आहे.  


हे देखील वाचा-