IND vs AUS 2nd Test : भारतीय क्रिकेट संघ (Team India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) संघ यांच्यात चार कसोटी सामन्यांनी बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिका खेळवली जात आहे. आजपासून दुसरा सामना दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात असून ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत फलंदाजी निवडली आहे. त्यामुळे भारत क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला आहे. मालिकेतील पहिला सामना भारताने एक डाव आणि 132 धावांनी जिंकत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. आता दुसरा सामना सुरु आहे. दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये एन्ट्रीसाठी ही मालिका जिंकणं दोन्ही संघासाठी फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे ही मालिकाही महत्त्वाची आहे.  


आजच्या सामन्यात जर अंतिम 11 चा विचार केला तर भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर फिट असल्यामुळे संघात परतला आहे. त्याला अंतिम 11 मध्ये संधी दिली गेली आहे. सूर्यकुमार यादव याला त्यामुळे विश्रांती देण्यात आली आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया संघातही काही बदल करण्यात आले आहे.


कशी आहे दोन्ही संघाची प्लेईंग 11


ऑस्ट्रेलियाा : डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, पीटर हँड्सकॉम्ब, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), टॉड मर्फी, नॅथन लियॉन, मॅथ्यू कुहनेमन
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, श्रीकर भारत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज


पाहा नाणेफेकीचा व्हिडीओ-






 


कुठे पाहता येणार सामना?


भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.   


भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया Head to Head






भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 121 कसोटी सामने खेळले गेले आहेत. यामध्ये भारतीय संघाने 31 सामने जिंकले आहेत, तर ऑस्ट्रेलियाने 43 सामने जिंकले आहेत. याशिवाय 28 सामने ड्रॉ झाले असून एक सामना बरोबरीत सुटला आहे. 


हे देखील वाचा-