IND vs AUS 2nd Test Live Streaming: भारतीय क्रिकेट संघ (Team India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) संघ यांच्यात सध्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिकेला सुरुवात झाली आहे. यामालिकेत एकूण 4 कसोटी सामने खेळवले जाणार होते, ज्यातील पहिला सामना भारताने एक डाव आणि 132 धावांनी जिंकत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. आता दुसरा सामना उद्या अर्थात 17 फेब्रुवारीपासून दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये एन्ट्रीसाठी ही मालिका जिंकणं दोन्ही संघासाठी फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे ही मालिकाही महत्त्वाची आहे. तर या महत्त्वाच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्याची माहिती जाणून घेऊ... 

कधी होणार सामना?

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा दुसरा कसोटी सामना (India vs Australia 2nd Test) उद्या अर्थात, 17 फेब्रवारी रोजी होणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 9.30 वाजता सामना खेळवला जाईल. त्यापूर्वी अर्धातास आधी नाणेफेक होणार आहे. 

कुठे आहे सामना?

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा कसोटी सामना  दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर (Delhi Cricket Stadium)  खेळवला जाणार आहे.  

कुठे पाहता येणार सामना?

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.   

भारतीय संघ 

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उप कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकिपर), इशान किशन (विकेटकिपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविंद्र जाडेजा, मोहम्मद सिराज, उमेश यादव. जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव 

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया Head to Head

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 121 कसोटी सामने खेळले गेले आहेत. यामध्ये भारतीय संघाने 31 सामने जिंकले आहेत, तर ऑस्ट्रेलियाने 43 सामने जिंकले आहेत. याशिवाय 28 सामने ड्रॉ झाले असून एक सामना बरोबरीत सुटला आहे. 

ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याचं वेळापत्रक (2023)

सामना तारीख ठिकाण
दुसरा कसोटी सामना 17-21 फेब्रुवारी 2023 दिल्ली
तिसरा कसोटी सामना 1-5 मार्च 2023  धर्माशाला
चौथा कसोटी सामना 9-13 मार्च 2023  अहमदाबाद
पहिला एकदिवसीय सामना 17 मार्च 2023  मुंबई
दुसरा एकदिवसीय सामना 19 मार्च 2023  विशाखापट्टम
तिसरा एकदिवसीय सामना 22 मार्च 2023  चेन्नई

हे देखील वाचा-